कोकणमहाराष्ट्रवैभववाडीशासकीयसिंधुदुर्ग

◾वनक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हीची हत्याच झाली,आत्महत्येला जबाबदार असलेले वनविभागातील वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार, श्री. रेड्डी यांना फाशीची शिक्षा द्या..

 

◾महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघ यांच्या वतीने वैभववाडी पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले निवेदन..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी, दि-३०:-  वनक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण हीची हत्याच झाली आहे. या आत्महत्येला जबाबदार असलेले वनविभागातील वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार, श्री. रेड्डी यांना फाशीची शिक्षा द्या. या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य बेलदार भटका समाज संघ यांच्या वतीने वैभववाडी पोलीस निरीक्षक अतुल जाधव यांना देण्यात आले आहे. संबंधित गुन्हेगारांना शिक्षा न झाल्यास राज्यातील बेलदार समाजाला रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल असा इशाराही संघाचे कार्याध्यक्ष संजय चव्हाण यांनी दिला आहे.

वनविभाग क्षेत्र हरिसाल अमरावती या ठिकाणी वनक्षेत्र अधिकारी म्हणून दीपाली चव्हाण कार्यरत होत्या. 25 मार्च रोजी स्वतःवर गोळी झाडून घेत तिने आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात तिने वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार खूप त्रास देतो. अश्लील भाषेत शिवीगाळ करतो. फोन करून धमक्या देतो असे म्हटले आहे. त्याच बरोबर आपल्याला होणाऱ्या त्रासामुळे आपला गर्भपात झाला असेही तिने पत्रात म्हटले आहे. शिवकुमार गलिच्छ भाषेत शिवीगाळ करून कामावरून काढून टाकण्याच्या वारंवार धमकी देत होता. रात्री-अपरात्री साईड वर जा. असंही सांगत होता. सदर होणारा त्रास आपण वरिष्ठ अधिकारी रेड्डी यांना सांगितले. तरीदेखील त्यांनी दुर्लक्ष केले असे पत्रात म्हटले आहे. या दोघांच्या त्रासाला कंटाळून तिने आत्महत्या केली आहे असे निवेदनात बेलदार समाजाने म्हटले आहे.

निवेदन देतेवेळी महाराष्ट्र राज्य बेलदार समाज कार्याध्यक्ष संजय चव्हाण, सल्लागार मारुती मोहिते, सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष किरण चव्हाण, कोकण युवा अध्यक्ष संतोष पवार, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पवार, विष्णू चव्हाण, वैभववाडी तालुका अध्यक्ष रोहित पवार, रमेश चव्हाण, मंगेश चव्हाण, चंद्रकांत चव्हाण, अनिल जाधव, आकाश मोहिते, गणेश मोहिते, विकी मोहिते, विजय मोहिते, सचिन चव्हाण, आदित्य चव्हाण, बबलू मोहिते, मनीषा चव्हाण, सुरेखा चव्हाण, दर्शना पवार, सविता पवार, अंकिता मोहिते, सुलोचना पवार, मयुरी चव्हाण, मणाली चव्हाण, चिनू पवार, सलोनी पवार, समीक्षा चव्हाण, अस्मिता चव्हाण, संगीता मोहिते, तेजस्विनी चव्हाण व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!