कुडाळकोकणमहाराष्ट्रराजकीयसिंधुदुर्ग

◾दर पाच वर्षांनी कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर उगवणाऱ्या बांडगूळानी मनसेला “अक्कल” शिकवू नये ; उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे

 

◾विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांची बुद्धी भ्रष्ट म्हणणारे कुडाळ शिवसेना शहरप्रमुख कायमच “असंतोषी” म्हणूनच मनसेवर आगपाखड

◾पक्षात स्वतःचं स्थान निर्माण करण्यासाठीच मनसेवर टीका..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ, दि-२८ :- कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसाच्या अनुषंगाने “तलवारी”मुळे समोर निर्माण झालेल्या वादावर मनसेला प्रत्युत्तर देताना मनसेच्या कार्यकर्त्यांची अक्कल काढणारे व बुद्धी भ्रष्ट म्हणणारे कुडाळ शहर प्रमुख मनसेवर आगपाखड करून स्वतःची पक्षातील पत वाढवण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत.मुळात कुडाळ नगरपंचायत निवडणुकीच्या तोंडावर आपण पक्षात सक्रिय आहोत हे दाखवण्याऱ्या या “असंतोषी” सेना पदाधिकाऱ्याची कीव येते. मागील 10 वर्षातील शिवसेनेचा भ्रष्ट कारभार जनतेसमोर मनसे उघडा करते या द्वेषापोटीच मनसेच्या पदाधिकऱ्यांवर निरर्थक टीका टिप्पणी केल्याने महाराष्ट्र सैनिकांकडून होणारी “पोलखोल” थांबणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावं.शिवाय अलीकडेच “निगुडकर” हॉस्पिटल प्रकरणांत आपल्यावर गुन्हा दाखल होऊ नये यासाठी याच मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे विनवण्या करण्याची वेळ आलेली होती हे देखील त्यांनी विसरू नये. याआधी मनसे पक्षात प्रवेश केल्यानंतर पक्षात शेवटपर्यंत “स्थान” न मिळाल्याने हाताला कोणतंही पद लागत नाही याने हताश होऊन आधी भाजप व नंतर सेनेत प्रवेश केलेल्या शहर प्रमुखांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा स्वतःच्या पक्ष संघटनेत आपलं स्थान शोधावं असा मैत्रीचा सल्ला कुडाळ उपतालुकाध्यक्ष दिपक गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!