राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर च्या भरारी पथकाने तीन वर्षांत केली पावने सात कोटी ची अवैध दारू जप्त
▪️राज्य उत्पादन शुल्काच्या या भरारी पथकाचा सिंधुदुर्गातील दारु तस्करांंनी घेतला धसका
▪️उत्पादन शुल्क निरीक्षक एस एस साळवे व त्यांच्या सहकाऱ्यांच्या पाठीशी कोकण लाईव्ह ठामपणे उभे
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 संपादकीय :सिताराम गावडे*
🎴सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क विभाग अर्थातच दारूबंदी खाते सिंधुदुर्गात अस्तित्वात आहे की नाही हे बहुतांशी जनतेला माहितीच नव्हते,जे अवैध मार्गाने दारू धंदा करतात त्यांना हे खाते कुठे कार्यरत आहे ,त्याचे अधिकारी कोन ते माहिती होते व त्यांच्या खात्यामार्फत त्यांना तोंडी अवैध दारू विक्री चा परवाना देण्यात आला होता,गोवा राज्यातून महाराष्ट्र राज्यात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात किंवा महाराष्ट्र राज्याचा इतरत्र जिल्ह्यात कोट्यवधी रुपयांची दारू महिन्याकाठी जात होती व यामध्ये झटपट श्रीमंत होण्याच्या नादात कॉलेज युवक ओढले जात होते व ही नवी युवा पिढी बरबाद च्या दिशेने वाटचाल करत होती, याबाबत कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल च्या माध्यमातून आम्ही सातत्याने आवाज उठविल्यानंतर राज्य उत्पादन शुल्क खाते खडबडून जागे झाले नव्हे तर त्यांना या खात्याचे आयुक्त कांतीलाल उमाप यांनी जागे केले, गोवा राज्यातून येणाऱ्या अवैध दारु वर कारवाई होऊ लागली, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दारूबंदी खाते निद्रिस्त असले तरी कोल्हापूर विभागातून येणारे भरारी पथक मात्र या जिल्ह्यात येऊन उत्कृष्ट कामगिरी करत होते. खात्याचे पोलीस निरीक्षक एस एस साळवे उपनिरीक्षक जितेंद्र पवार ,कुमार कोळी, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुहास वरुटे, तसेच जवान सुखदेव सिद, प्रदीप गुरव, वाहन चालक दीपक कापसे यांनी प्रामाणिकपणे काम करत सिंधुदुर्ग जिल्ह्यात २०१८ ते २०२१ पर्यंत ६ कोटी ६३लाख ८२ हजार ६५७ रुपयाची अवैध दारू जप्त केली.
म्हणजेच या भरारी पथकाचे काम सुरळीत चालले असताना कोल्हापुरचे भरारी पथक घेऊन सिंधुदुर्गात येऊन धुडगूस घालते अशा प्रकारची आवई सिंधुदुर्ग दारूबंदी खात्यातील काही झारीतील शुक्राचार्यांनी काही पंटरना हाताशी धरून सोशल मीडिया वर पसरून जे कारवाई करतात त्यांना रोखण्याचे काम करत होते, वास्तविक कोल्हापूर जिल्ह्यातील येणार हे भरारी पथकाची कारवाई खरोखरच वाखाणण्याजोगी आहे, काम करणाऱ्याला नाउमेद करू नये या मताचे आम्ही असल्यामुळे सदरचे वृत्त आम्हाला खटकले एक तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राज्य उत्पादन खाते काहीच करत नाही व भरारी पथकाच्या अधिकाऱ्यांनी कारवाई केली तर पडद्याआडून त्यांच्यावर टीका करायची ही भूमिका आमच्या बुद्धीला पटणारी नव्हती म्हणून एक दिवस तरी अशा लोकांना उघडे करायचे असा संकल्प आम्ही केला होता.
यासाठी माहितीच्या अधिकारात राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर विभाग भरारी पथकाने केलेली कारवाई ची माहिती मागवली या पथकाने सिंधुदुर्गात अनेक ठिकाणी धाडी टाकत, अनेक मोहरक्यांना जेरबंद केले ,काहीजणांचे तडीपार चे प्रस्तावही तयार केलेत, एस. एस साळवे या पोलीस निरीक्षकाचे सिंधुदुर्गात आगमन झाले असे समजतात दारू धंदा करणारे बिळात जाऊन लपून बसायचे एवढी दहशत या अधिकाऱ्यांची या जिल्ह्यात आहे. व अशी दहशत असणारे अधिकारी जर या जिल्ह्याचे प्रमुख असते तर गोवा राज्यातून येणारी अवैध दारू वाहतूक कधीच थांबली असती व अनेकांचे बळीही गेले नसते.
मात्र जे चांगले काम करतात त्यांना त्रास द्यायचा आपणही काम करायचे नाही, पडद्यामागे राहून कोणालातरी पुढे करून त्यांच्यावर टीका टिप्पणी करायची असे धोरणं राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असेल तर या विभागाच्या विरोधात आम्ही तेवढ्याच ताकदीने उभे राहू हे याठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो.
सिंधुदुर्ग पंचविशीतील युवक या विषारी दारू मुळे आपले प्राण गमावून बसले ,म्हातारपणात वडिलांची काठी होणारी मुले वडिलांनाच त्यांचा आधार बनावे लागले,सोळा सतरा वर्षाची मुले या अवैध पैशावर पन्नास वर्षे महिलेशी शय्यासोबत करून तिचा खून करून आंबोली सारख्या दरीत फेकून देतात तेव्हा ही घटना मन सुन्न करून टाकणारी होती, म्हणूनच याला कुठेतरी लगाम घातला पाहिजे हे कुठेतरी थांबले पाहिजे ,या हेतूनेच आम्ही या प्रकरणात गेले सहा महिने या विषयावर सडेतोड लिखाण केले व जिल्ह्यातील राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांना जागे करून सळो कि पळो करून सोडले.
जिल्ह्यातील अवैध दारू ७०टक्के तरी बंद झाली राजरोसपणे फिरणारे दारू माफिया कुठच्या तरी बिळात जाऊन लपून बसलेत,एकाच गुन्ह्यात पुन्हा पुन्हा सापडणाऱ्या दारू तस्करांना तडीपार करावे अशी मागणी आम्ही राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या आयुक्तांकडे केली होती कायद्यातील तरतुदीनुसार अशाप्रकारचे प्रस्तावही भरारी पथकाच्या प्रमुख यांनी बनवले व काही लोकांना तडीपार च्या नोटीसाही निघाल्यात,प्रामाणिकपणे काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची आम्ही शंभर टक्के कौतुक करून त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू याची ग्वाही या ठिकाणी देत आहोत, मात्र अशा अधिकाऱ्यांना अडचणीत आणण्यासाठी झारीतील शुक्राचार्य पडद्यामागून काही हालचाली करत असतील तर अशा अधिकाऱ्यांवर करडी नजर ठेवून त्यांचेही पितळ उघडे पाडले शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही हे संबंधितांनी ध्यानी ठेवावे.
आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई . कांतीलाल उमाप यांचे आदेशानुसार व . विभागीय उप आयुक्त. राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापुर विभाग कोल्हापूर यशवंत पवार यांचे मार्गदर्शनाखाली खालील प्रमाणे कार्यवाही करण्यात आले असून त्यामध्ये में २०१८ ते २२मार्च २०२१अखेर एकूण केसेस १०७९, वारस ५२२, बवारस ५५७, अटक आरोपी ५४२.गावठी दारू ४८९९ लि., रसायन १९८३०५लि.. देशी दारू ७०३ब. लि., विदेशी दारू १२९ब. लि. बनावट स्कॉच ३०ब. लि.., भारतीय बनावटीचे विदेशी मद्य २७००ब. लि. परराज्यातील विदेशों मद्य २८४५४ व. लि..ताडी ४९४ लि. स्पिरीट १६००लि., काळा गुळ ८६९० किला ग्रम, जप्त वाहन ८५ व एकुण मुदमाल किंमत ६,६३,८२,६५७/- इतका किमतीचा जप्त करण्यात आला आहे. तसेच गावठी दारू विक्रो व गोवा विदेशी मद्य विक्रोची दोन जागा सिल करण्यात आले आहेत यापुढेही उत्पादन शुल्क विभागाच्या मार्फत अशा प्रकारच्या कार्यवाया चालू राहणार असून महाराष्ट्र शासनाचा अवैद्य मद्यापासून होणारे महाराष्ट्र शासनाचे महसुलाचे नुकसान होणार नाही या दृष्टीने प्रयत्न राहतील व अशा प्रकारे अवैद्य मद्याबाबत गोपनीय माहिती देणा-या व्यक्तीस शासनामार्फत योग्यते बक्षीस देवून सदर व्यक्तीचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल तरी अवैद्य मद्यावाबत माहीती असल्यास निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, विभागीय भरारी पथक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर या कार्यालयास देण्यात यावी.असे आवाहनही करण्यात आले आहे.
अशा प्रकारचे काम कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक करत असताना त्याना ना उमेद करण्यासाठी काही झारीतील शुक्राचार्य सदरचे पथक सिंधुदुर्गा येऊन मौज मजा करते अशा प्रकारचे मनोधैर्य खच्चीकरण करणारे वृत्त देऊन आधिकार्यांना नाउमेद करण्याचा प्रयत्न करीत आहेत ,मात्र हे झारीतील शुक्राचार्य कोण आहेत? ,त्यांचा यामागचा उद्देश काय?स्वतः काही करायचे नाही इतना करायला द्यायचे नाही, हप्ता खाऊन सुस्त बसायचे हे त्यांचे धोरण, त्यामुळे त्यामुळे वस्त,मस्त ,फस्त जे कोणी असतील त्या सर्वांना वटणीवर आणल्याशिवाय कोकणगाव ब्रेकिंग न्यूज चॅनल स्वस्थ बसणार नाही.
जे अधिकारी प्रामाणिकपणे काम करतील त्या अधिकाऱ्यांच्या पाठीशी त्याच ताकदीने कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनल संपादक या नात्याने मी राहीन असा शब्द देतो.
आता या भरारी पथकाने गोवा राज्यातून मोठ्या प्रमाणात एक्टिवा,एव्हीएटर या दुचाकी तुन गोवा बनावटीची दारू सिंधुदुर्गात आणली जात आहे, ५० रुपयांच्या पेट्रोलमध्ये पाच हजाराची दारू ॲक्टिवा मधून येत असल्याने कॉलेज युवक दिवसातून दोन ट्रिपा टाकून ही दारु सिंधुदुर्गात आणत आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांनी अशा वाहनांवर लक्ष ठेवून त्यांच्यावर कठोर कारवाई केल्यास सिंधुदुर्गात गोवा राज्यातील दारू येण्याचे प्रमाण शून्य टक्क्यावर येईल असे आमचे ठाम मत आहे, पुन्हा एकदा कोल्हापूर विभागाच्या भरारी पथकाचे आम्ही मनापासून अभिनंदन करीत आहोत.
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

