◾सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज आढळलेत ७३ कोरोना बाधित रुग्ण ..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुनील आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी,ता.२८:- जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ६ हजार ४१४ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ३७५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी ७३ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली.तर सावंतवाडी शहरात न्यू खासकील वाडा १ सालई वाडा ४ असे एकूण शहरात पाच कोरोना रुग्ण आढळले. तर आजगाव १ माजगाव १ बांदा १ निरवडे सिल्वर एकर १असे ४ रुग्ण तालुक्यात आज दिवसभरात आढळलेत.

