कोकणमनोरंजनमहाराष्ट्ररत्नागिरीसामाजिक

◾युवासेना उपतालुकाधिकारी संजय चांदे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम.

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : संतोष पिलके

 🎴चिपळूण, दि- २८ :- युवासेना उपतातुका अधिकारी संजय चांदे यांच्या वाढदिवसानिमित्त २५ मार्च रोजी विविध सामाजिक उपक्रम राबवून संपन्न झाला.

यावेळी जि.प.शाळा कापसाळ नं.१ मध्ये विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करण्यात आल्या तसेच शिक्षकांच्या मागणी नुसार शिक्षकांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.तसेच धामणवणे शिगवणवाडी येथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अंखड हरिनाम सप्ताह निमित्ताने पाडुरंगाचे मनोभावे दर्शन घेऊन भाविकांना फळहार वाटप केले.

यावेळी चिपळूण युवासेना तालुका प्रमुख उमेश खताते, कापसाळ शिवसेना विभाग प्रमुख राम डिगे,माजी आमदार सदानंद चव्हाण यांचे चिरंजीव पुष्कर चव्हाण, युवासेना सचिव प्रतिक शिंदे,कापसाळचे उपसरपंच प्रकाश डिगे, उपविभाग प्रमुख नितिन शिगवण, पेढे गावचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य दिपक मोरे,शाखा प्रमुख संतोश रहाटे व अशोक डिगे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!