◾बांदा ग्रामस्थांच्या वार्षिक पदयात्रांची सांगता सोहळा उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा, दि२८ :- बांदा ग्रामस्थांच्या वार्षिक पदयात्रांचा सांगता सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे मोरगाव येथिल प्रसिद्ध श्री देव म्हातारेबाबा देवस्थान येथे मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. दरवर्षी शेकडो भाविकांच्या उपस्थितीत हा सांगता कार्यक्रम केला जातो. मात्र यावर्षी शासनाचे कोरोनाविषयक दक्षतेचे नियम पाळून मर्यादित स्वरुपात हा कार्यक्रम करण्यात आला.
सकाळी बांदा श्री बांदेश्वर मंदिर येथुन पदयात्रींनी यात्रेस आरंभ केला. मार्गात डेगवे येथे श्री महालक्ष्मी स्थापेश्वर दर्शन घेतले. मोरगाव येथे पोहचताच श्री देव म्हातारेबाबा मंदिरात दर्शन घेऊन नामस्मरण करण्यात आले.तसेच नैवेद्य अर्पण करुन आरती करण्यात आली. त्यानंतर श्री देव म्हातारेबाबा चरणी सर्वांच्या कल्याणासाठी गाऱ्हाणे घालण्यात आले. पदयात्रा मंडळाचे अध्यक्ष उमेश मयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व पदयात्री व सेवेकरी मंडऴी यांनी या कार्यक्रमाचे शिस्तबद्ध नियोजन केले.सर्व पदयात्रींना मास्क वापरण्याबाबत सुचना देण्यात आल्या होत्या.
यावर्षी पदयात्रा मंडळातर्फे माणगाव श्री दत्तमंदिर, दाणोली श्री साटम महाराज समाधी मंदिर ,माडखोल श्री साई वात्सल्यधाम ,कास श्री वाघबिळकार देवस्थान , सटमट श्री रामभटस्वामी समाधी मंदिर , डिंगणे श्री स्वामी समर्थ मठ , सोनुर्ली श्री देवी माऊली ,मातोंड श्री घोडेमुख देवस्थान , रेडी श्री गणेश मंदिर आदी ठिकाणी पदयात्रा करण्यात आल्या. या सर्व पदयात्रांचा सांगता कार्यक्रम प्रतिवर्षाप्रमाणे श्री म्हातारेबाबा देवस्थान येथे भक्तीभावाने करण्यात आला.

