◾स्मशानभूमीत प्रेत सामुग्री नेण्यासाठी रस्ता मोकळा न झाल्यास, प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन केले जाईल..
◾चर्मकार ठाकर समाजाच्या वतीने निवेदना द्वारे देण्यात आला इशारा..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रतिक राणे
🎴दोडामार्ग,दि-२७:- कोणाळ ग्रामपंचायत कार्यक्षेत्रात येणाऱ्या चर्मकार ठाकर समाज यांच्यासाठी संयुक्त स्मशानभूमी बांधण्यात आली आहे. पण येथे जाण्यासाठी जमीन संपादन केली पण आजही वाट नसल्याने मृत व्याक्ती सामुग्री नेण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी शुक्रवारी दोडामार्ग तहसीलदार गटविकास अधिकारी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.या स्मशानभूमीत प्रेत सामुग्री नेण्यासाठी रस्ता मोकळा झाला नाही तर या पुढे प्रेत रस्त्यावर ठेवून आंदोलन केलं जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला.

