समाज कल्याण सभापती अंकुश जाधव यांचा कसालमध्ये सत्कार
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : सुनिल आचरेकर
🎴कसाल : दि. २७ मला मिळालेले सभापती पद म्हणजे कसाल, ओरोस मतदार संघातील मतदारांचा हा सन्मान आहे. समाज कल्याण समिती सभापती पदाची दुसऱ्यांदा संधी देत आपल्यावर खासदार नारायण राणे आमदार नितेश राणे खासदार नीलेश राणे यांनी टाकलेली जबाबदारी पूर्ण करणार आहे .या बरोबर गोरगरीब व मागासवर्गीय समाजातील व्यक्तींचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या व शासनाच्या विविध योजना सर्वसामान्य घटकापर्यंत प्राधान्याने पोचविणार आहे. तसेच भाजप पक्ष वाढी साठी आपण भर देणार असल्याचे समाज कल्याण समितीचे नूतन सभापती अंकुश जाधव यांनी कसाल येथे सत्कार समारंभात ते बोलताना सांगितले.
समाज कल्याण समिती सभापती पदाची दुसऱ्यांदा संधी मिळालेल्या अंकुश जाधव यांचा कसाल ग्रामस्थांच्यावतीने कसाल ग्रामपंचायत येथे सत्कार करण्यात आला . कसाल ओरोस जिल्हा परिषद मतदार संघ सदस्य अंकुश जाधव यांना दुसऱ्यांदा समाज कल्याण समिती सभापती पदी वर्णी लागली आहे. यामुळे कसाल ग्रामस्थांनी गावाचे वतीने समाजकल्याण सभापती अंकुश जाधव यांचा सत्कार करण्यात आला .
यावेळी कसाल पंचायत समिती सदस्य गोपाळ हरमलकर ,कसाल उपसरपंच दत्ताराम सावंत ,कसाल गावचे मानकरी यशवंत परब, बाळा मर्तल, काका मर्तल, पडवे सरपंच सुभाष दळवी ,कसाल तंटामुक्ती अध्यक्ष संतोष राणे, कसाल ग्रामविकास अधिकारी सौ एस बी कोकरे, पडवे ग्रामपंचायत सदस्य शिवराम सावंत आदीसह भाजप कार्यकर्ते पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते.

