उंबर्डे कुंभारवाडी रस्त्या नुतनीकरण कामाचा शुभारंभ…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संजय शेळके
🎴वैभववाडी : दि. २७ उंबर्डे कुंभारवाडी रस्त्या नुतनीकरण कामाचा शुभारंभ वैभववाडी भाजपा अध्यक्ष नासीर काझी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच शेरपूद्दीन बोबडे, उपसरपंच दशरथ दळवी, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष किशोर दळवी, तंटामुक्ती अध्यक्ष रत्नकांत बंदरकर, सोसायटी चेअरमन धर्मरक्षी जाधव उपस्थित होते. शुभारंभ प्रसंगी सर्व मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी सरपंच बोबडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना मुंबई मंडळ व ग्रामस्थ मंडळ यांची प्रत्येक कामाविषयी असलेली तळमळ मांडली. व गरज असलेल्या विकासकामांची यादी नासीर काझी यांच्याकडे सुपुर्द केली. तसेच 25/ 15 मधून मंजूर झालेला रस्ता व नळ पाणी योजना दुरुस्ती ,अंगणवाडी नळपाणी योजना मंजूर झाल्याचे सांगितले. नासीर काझी यांनी आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून गावात करण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेतला. कुंभारवाडीतील उर्वरित विकास कामे मार्गी लावली जातील असे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिल पाटील यांनी केले व आभार श्रीपत धामणकर यांनी मांडले. या कार्यक्रमाला वाडीतील सर्व मंडळी व मुंबईकर उपस्थित होते.

