आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचचा मे मध्ये वधु – वर सूचक पालक मेळावा

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर

 🎴चिपळूण : दि. २७ तालुका मुस्लिम विकास मंच यांच्यावतीने रविवार दि 30 मे रोजी वधू वर सूचक पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अद्यक्ष अन्वर भाई पेचकर यांनी दिली. चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच अन्वर भाई पेचकर यांच्या अद्यक्षतेखाली कोतुकास्पद काम करीत आहे त्याची दखल चिपळूण मध्ये नव्हे तर महाराष्ट्र मधील तमाम मुस्लिम बांधवांकडून घेण्यात येत आहे नुकतीच सामुदायिक विवाहाची अन्वर पेचकर यांची संकल्पनाची बातमी प्रसारित होताच अनेकानी त्यांचे कोतुक केले त्याचबरोबर त्यापूर्वी वधू वर सूचक पालक मेळावा घेण्यात याव्यात अशी मागणी केली.

त्यानुसार समाजबांधवांच्या मागणीनुसार 30 मेला चिपळूण येथे सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान वधू वर सूचक मेळावा आयोजित करण्यात आला आहे मेळाव्यात सहभागी होण्यासाठी इच्छुक असल्यास पालकांनी आपल्या पाल्याचे फोटो व परिचय पत्र अद्यक्ष अन्वरभाई पेचकर ( 9209887566 ) याच्या व्हाट्सएपवर पाठवावे ज्याच्याकडे स्मार्ट फोन नसेल अशा पाल्यानी पेचकर याना फोन करावा अथवा प्रत्यक्ष भेटावे असे आवाहन प्रवक्ते निसार शेख यांनी केले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!