कसाल येथे शिवसैनिकांकडून आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस साजरा
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : सुनिल आचरेकर
🎴कसाल : दि. २७ कुडाळ मालवण चे आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस कसाल येथील शिवसैनिकांनी कसाल शाळांमध्ये खाऊ वाटप करत साजरा केला. त्यावेळी छोटू पारकर, अवधूत मालणकर, डॉक्टर सूर्यकांत बालम, गिरीश मर्तल, अरुण राणे, माजी विभाग प्रमुख बाळा कांदळकर ,रमेश कदम, व्हिटर फर्नांडिस, ग्रामपंचायत सदस्य गणेश मेस्त्री, आदी सह शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

