आणखीआरोग्यकोकणवैभववाडीसिंधुदुर्ग

करुळ चेक नाक्यावर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संजय शेळके

🎴वैभववाडी : दि. २७ शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर करुळ चेक नाक्यावर परजिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांची आरोग्य तपासणी करण्यासाठी शुक्रवार पासून आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. कोरोना सदृश्य लक्षणे आढळल्यास त्या व्यक्तीला संदर्भ सेवा देण्यात येणार आहे.
शिमगोत्सव हा कोकणातील प्रमुख सण आहे. या उत्सवासाठी कोकणात मोठ्याप्रमाणात चाकरमानी दाखल होतात. माञ यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिमगोत्सव गाव मर्यादित व मर्यादित उपस्थित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत.

राज्यात कोरोनाचा पादुर्भाव पुन्हा झपाट्याने वाढत आहे. या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्गचे प्रवेशद्वार असलेल्या करुळ चेक नाक्यावर दिनांक २६ मार्च ते ३१ मार्चपर्यंत सकाळी ८ वा.ते संध्याकाळी ८.वा.पर्यंत आरोग्य पथक तैनात करण्यात आले आहे. परजिल्ह्यातून येणारी वाहने थांबवून प्रवाशांचे थर्मल स्कनिंग, आॕक्सिमिटरने तपासणी करण्यात येणार आहे. यात कोणाला कोरोना सदृश्य लक्षणे आढळली तर त्याला संदर्भ सेवा देण्यात येणार आहे. अशी माहीती आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.

कोरोनाचा पादुर्भाव राज्यात वाढत आहे. नागरीकांनी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डाॕ.पवार यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!