◾स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सिंधुदुर्ग यांचे कडून कवठणी येथे गावठी काजूच्या दारूची हातभट्टी उध्वस्त व मोठा दारूसाठा जप्त..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२६ :- आज सकाळी ०९ वाजता सावंतवाडी पोलीस ठाणे हद्दीत कवठणी (माठ) येथील घनदाट जंगलमय डोंगराळ भागात आरोपीत मनवेल लुइस डिसोझा, वय-५६ हा बेकायदेशीर पणे गावठी काजू फेणी दारूची हातभट्टी लाऊन दारू गाळताना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून सुमारे ७०० ली. काजूचे बोंडू मिश्रीत रासायन किंमत रू. ७०,०००/- २८० लीटर गावठी काजू फेणीची दारू रू.५६,०००/- व इतर हातभट्टीचे साहित्य रू.४०००/- असा मिळून १,३०,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. आरोपी विरुद्ध सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे.
सदर कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. राजेंद्र दाभाडे, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. तुषार पाटील व मा. पोलीस निरीक्षक श्री. सुनील धनावडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक श्री सचीन शेळके, पोलीस अंमलदार सुधीर सावंत, गुरुनाथ कोयंडे, अनिल धुरी, प्रविण वालावलकर, अनुप खंडे, कृष्णा केसरकर, प्रमोद काळसेकर, जयेश सरमळकर, चंद्रहास नार्वेकर, चंद्रकांत पालकर यांनी केलेली आहे.

