आणखीकोकणक्राइमसावंतवाडीसिंधुदुर्ग

वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर धडक कारवाई केली

🖥️Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴 सावंतवाडी : दि. २७ सातोळी बावळट इथे नाकाबंदी दरम्यान जिल्हा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी बेकायदेशीररित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर धडक कारवाई केली आहे.

गोवा बनावटीच्या ५०० दारूच्या बॉक्सची वाहतूक या टेम्पोतून ह़ोत होती‌. समोर बॅरल लावून अगदी शिताफीने ही दारू वाहतूक करण्याचा प्रयत्न दारू माफियांकडून करण्यात आला होता. मात्र, जिल्हा वाहतूक पोलीसांनी हा डाव उधळून लावत अवैध दारू वाहतूकीवर मोठी कारवाई केली आहे. यावेळी इंदोर येथील दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, २२ लाख ४ हजार ८०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई रात्री पावणेबाराच्या दरम्यान करण्यात आली आहे. गोव्यातून नांदेड इथ ही दारू वाहतूक होत होती. पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे, पोलिस निरीक्षक अविनाश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय श्री. वटकर, पोलिस अजित घाडी, वाहतूक पोलीस विलास नर, प्रशांत धुमाळे, मयुर सावंत, श्री. संकपाळ यांनी ही धडक कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!