कणकवली नगरपंचायतचे नियमित, कंत्राटी कर्मचारी, शिपाई यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २६ स्वच्छ सर्वेक्षण २०२१ मध्ये कणकवली नगरपंचायतच्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीबद्दल व त्यांनी शहर स्वच्छतेबाबत तळमळीने केलेल्या कामाबद्दल, तसेच मोहिमेत सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल या सर्व कर्मचाऱ्यांचा नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांच्याहस्ते सहभाग प्रमाणपत्र फ्रेम व पुष्पगुच्छ देत गौरव करण्यात आला.
कणकवली नगरपंचायतचे नियमित, कंत्राटी कर्मचारी, शिपाई यांना हे सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, स्वच्छ सर्वेक्षणचे समन्वयक प्रितिष खैरे, सतीश कांबळे, ध्वजा उचले आदी उपस्थित होते.

