सावंतवाडी पोलिसांची कारवाई; भंगाराच्या आडून सुरू होती वाहतूक…
🖥️Kokan Live Breaking News
✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग
🎴सावंतवाडी दि. २५ बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी सावंतवाडी पोलिसांनी २० लाखांच्या गाडीसह तब्बल ३० लाखाचा दारूसाठा जप्त केला आहे.ही कारवाई बावळाट येथे करण्यात आली. याप्रकरणी हरियाणा येथील एकाला ताब्यात घेण्यात आले आहे.र वींद्र रामकिशन वय ३० असे त्याचे नाव आहे.
गाडीत भंगार असल्याचे सांगून अज्ञात व्यक्तीकडून आपल्याकडे ही गाडी देण्यात आली होती. याबाबत अधिक आपल्याला माहीती नाही,असे चालकांचे म्हणणे आहे. दरम्यान या वाहतूकी मागे मोठे रॅकेट असण्याचा संशय पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांनी व्यक्त केला आहे.

