आणखीकणकवलीकोकणराजकीयसिंधुदुर्ग

वैभववाडी तालुक्यातील दुसरी स्मार्ट ग्रामपंचायत ठरली ग्रामपंचायत सडूरे शिराळे

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संजय शेळके

🎴 वैभववाडी : दि. २५ तालुक्यातील दुसरी स्मार्ट ग्रामपंचायत ठरली ग्रामपंचायत सडूरे शिराळे. वैभववाडी तालुका पंचायत समितीच्या सभापती अक्षता डाफळे यांच्या शुभहस्ते करण्यात आला. यावेळी उपस्थित भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष किशोर दळवी, ग्रामपंचायतचे सरपंच संतोष पाटील, ग्रामपंचायतचे सदस्य तथा भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस नवलराज काळे, स्मार्ट ग्रामपंचायत योजनेचे संकल्पक सन सॉफ्टवेअर कंपनीचे अध्यक्ष श्री. खोत, गावचे पोलीस पाटील प्रकाश रावराणे, ग्रामपंचायत सदस्या पुनम रामाने, आकांक्षा जंगम सुनिता धामणे कल्पना पाटील, ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक प्रशांत जाधव, गावचे जेष्ठ नागरिक फोपे गुरुजी, संजय जंगम, बबन रावराणे, मनोहर बोडेकर, संभाजी रावराणे, माजी उपसरपंच सखाराम पाटील माजी उपसरपंच तथा भाजपा बूथ अध्यक्ष सत्यवान डांगे, विजय पाटील, सहदेव पाटील, शिवसेनाप्रमुख संतोष भोसले, केशव राऊत, दीक्षा रावराणे, सुलोचना डांगे, ग्रामपंचायत चे सर्व कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या वेळी ही स्मार्ट ग्रामपंचायत बनवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी आपले योगदान दिले. ते ग्रामपंचायत कर्मचारी सुनील राऊत, पाणी कर्मचारी अशोक पाटील, डाटा ऑपरेटर रुपाली रावराणे यांचा यथोचित सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे 31 मार्च 2021 रोजी सेवानिवृत्त होणारे गावचे पोलीस पाटील श्री प्रकाश रावराणे यांचाही याठिकाणी सभापती यांच्या शुभहस्ते सत्कार सन्मान करण्यात आला.

स्मार्ट ग्रामपंचायत झाल्यानंतर जनतेला आपण भरलेले घरपट्टी, पाणीपट्टी याचा हिशोब पासबुक द्वारे मिळणार आहे. त्यामुळे ग्रामपंचायत कारभारात पारदर्शकता दिसणार आहे. भारत देश डिजिटल इंडियाच्या मार्गावर असताना ग्रामपंचायत सडूरे शिराळे यांचे डिजिटल इंडिया या संकल्पनेकडे एक पाऊल पुढे पडत आहे. याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असं वक्तव्य सभापती अक्षता डाफळे यांनी केले. यावेळी बोलत असताना सभापती यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केलं ते ग्रामपंचायतीचे सदस्य श्री नवलराज काळे यांच कौतुक करत म्हणाल्या काळे यांच्या रूपाने गावाला सक्षम नेतृत्व मिळाले, त्यांच्या पाठपुराव्यामुळे सडूरे शिराळे गावचे अनेक कामे आम्ही मार्गी लावू शकलो असं सांगत काळे यांच्या कार्याचं सभापती महोदय यांनी कौतुक केले. स्मार्ट ग्रामपंचायत करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कमिटीला शुभेच्छा देत उपस्थित ग्रामस्थांचे आभार मानले,

तसेच अनेक स्तरावरून ग्रामपंचायत मध्ये जेवढे काही निधी येथील तेवढे निधी जनतेसाठी गावात घेऊन येऊन विकास कामे मार्गी लावण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. जे उपक्रम जनतेसाठी नेहमीच राबवण्याचा मी व आमच्या सहकाऱ्यांनी प्रामाणिक प्रयत्न केला. जनतेने, महिलावर्ग असो किंवा युवावर्ग असो, यांनी मला व माझ्या सहकाऱ्यांना नेहमी उस्फूर्त प्रतिसाद दिला आणि त्यांच्यामुळेच असे उपक्रम करण्यास मला प्रेरणा मिळाली. “ग्रामपंचायत हा विकासाचा केंद्रबिंदू आहे” व जनतेने ग्रामपंचायत मध्ये सक्षम उमेदवार ,सक्षम सरपंच निवडून दिला तर गावाचा विकास व्हायला वेळ लागणार नाही. गावच्या सर्वांगीण विकासासाठी जनतेची एकता महत्त्वाची आहे. तसेच ग्रामसेवक प्रशांत जाधव यांच्यासारखे ग्रामसेवक आपल्या ग्रामपंचायतीला लाभले हे आमचं भाग्य आहे. नक्कीच ते पुढील दहा वर्षे आमच्या ग्रामपंचायतीत ग्रामसेवक म्हणून कार्यरत राहिले तर गावचा सर्वांगीण विकास व्हायला वेळ लागणार नाही. ऑगस्ट महिन्यापासून त्यांनी जे ग्रामपंचायतीमध्ये काम केले त्याचा आढावा घेता त्यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार देण्यात यावा एवढं काम श्री. जाधव यांनी केले.अशा कर्मचार्‍यांच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभे राहणं काळाची गरज आहे. तेव्हाच आपल्या गावाचा विकास होईल, असे वक्तव्य ग्रामपंचायत सदस्य नवलराज काळे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन व प्रास्ताविक ग्रामसेवक प्रशांत जाधव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!