चिपळूण काँग्रेसची महागाई विरोधात निषेध रॅली
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴 चिपळूण : दि. २५ येथील काँग्रेसने महागाई विरोधात निषेध रॅली काढून केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी केली. या निषेध रॅलीमध्ये रत्नागिरी जिल्हा प्रभारी मनोज शिंदे, प्रदेश पदाधिकारी इब्राहिम दलवाई, जिल्हाध्यक्ष ऍड. विजय भोसले, माजी तालुकाध्यक्ष भरत लब्ध, शहराध्यक्ष लियाकत शाह उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या रॅलीत उत्साह जाणवत होता. काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या हाती काँग्रेसचे झेंडे व निषेध फलक होते.
काँग्रेस सरकारच्या काळात असणारे पेट्रोल,डिझेल व स्वयंपाकाच्या गॅसचे दर आजच्या केंद्र सरकारच्या काळात दुप्पटीपेक्षाही जास्त झालेले आहेत. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे अर्थव्यवस्था पूर्णतः कोलमडली असून महागाई गगनाला भिडली आहे. या प्रचंड महागाई विरोधात चिपळूण काँग्रेसने भाजी मंडई पासून गुरुवारी निषेध रॅलीला सुरुवात केली. यावेळी बैलगाडी, घोडे, प्रतिकात्मक गॅस सहभागी करून चिपळूणवासीयांचे लक्ष वेधले होते. तर रॅलीची सुरुवात झाल्यानंतर नगर परिषदेसमोरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला या नंतर ही रॅली चिंचनाका,र्इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्र परिसर मार्गे प्रांताधिकारी कार्यालयात दिशेने काढण्यात आली. यावेळी चिपळूण काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष निर्मला जाधव, सेवादल महिला जिल्हाध्यक्ष निलम शिंदे, सुरेश पाथरे, माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार थरवळ,नगरसेवक कबीर काद्री, करामत मिठागरी, नगरसेविका सफा गोठे, संजीवनी शिगवण, माजी नगरसेवक सुरेश राऊत आदी सहभागी झाले होते.