श्री. कुलस्वामिनी भवानी – वाघजाई देवस्थान, श्री. क्षेत्र टेरव येथे सार्वजनिक होलीकोत्सव व त्रैवार्षिक समा जत्रोत्सव साधेपणाने साजरा होणार.
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : संतोष पिलके
🎴 चिपळूण : दि. २५ श्री. कुलस्वामिनी भवानी – वाघजाई देवस्थान, श्री. क्षेत्र टेरव ता. चिपळूण यांनी सर्व भाविकांना आवाहन केले आहे की, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सालाबादप्रमाणे येथे होणारा सार्वजनिक होलीकोत्सव व त्रैवार्षिक समा जत्रोत्सव यंदा फक्त धार्मिक विधी पार पाडून गावातील प्रमुख ग्रामस्थ, मानकरी व पूजारी यांचा उपस्थितीत शासनाच्या आदेशानुसार साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे.
टेरव गावचे ग्रामदेवत एक जागृत देवस्थान म्हणून सर्वत्र प्रसिद्ध आहे. या देवस्थानाच्या होळीकोत्सवाला दरवर्षी प्रचंड गर्दी उसळत असते पण गेल्यावर्षी सन २०२० व यावर्षी सन २०२१ या कालावधीत कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने या साथीच्या रोगापासून आपल्या ग्रामस्थाचे व भावीनकांचे रक्षण व्हावे, म्हणून सदरचा होळीकोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला असून होळी व देवीच्या शिंपण्याच्या दिवशी नियमाप्रमाणे व शास्त्रा प्रमाणे सर्व धार्मिक विधी पार पडतील.
तसेच जागृत आणि स्वयंभू श्री कालिका मातेचा त्रैवार्षिक जत्रोत्सव सोहळा (समा) ४ एप्रिल रोजी साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
भाविक, चाकरमानी तसेच माहेरवाशिणीचें कोरोना या संसर्गजन्य रोगा पासून रक्षण व्हावे म्हणून ग्रामस्थांनतर्फ होळीदिनी देवीस साकडे घातले जाणार आहे. शासनाच्या आदेशानुसार सर्व नियम व अटींचे पालन करून वरील उत्सव साजरे करण्यात येतील असे ग्रामस्थां तर्फे सांगण्यात आले आहे.