..तर रिपाइं रस्त्यावर उतरेल ; सुशांतभाई सकपाळ

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : खेड

🎴खेड,दि-२५:- खेड शहरातील येथील जिजामाता उद्याना मधील घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याची २६मार्च रोजी अज्ञात समाजकंटकांनी विंटबना केली या घटनेला ३ वर्ष उलटून देखील अद्यापि समाज कंटका च्या मुसक्या न आवळ ल्याने येथील आंबेडकरी जनतेवर यंत्रणेने अन्याय केला आहे त्यामुळे समाज कंटका चा शोध घेऊन त्यास गजाआड करणे गरजेचे आहे तसे न झाल्यास पोलीस यंत्रणे बाबत थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडावे लागेल असा गर्भित इशारा रिपाइंचे कोकण संपर्क प्रमुख सुशांतभाई सकपाळ यांनी प्रसिद्धी पत्रका द्वारे दिला आहे .

पुतळा विंटबना हा प्रकार तालुक्याला नव्हे तर जिल्ह्याला लाजवणारा ठरला होता खेड सारख्या सुसंस्कृत शहरात असा प्रकार घडणे म्हणजे गुण्यागोविंदाने राहणाऱ्या येथील सर्व समाजाच्या एकीला बाधा पोहचवण्याचा प्रकार होता या प्रकारामुळे रिपाइंचे सह अनेक सामाजिक संघटना रस्त्यावर उतरून समाज कंटकाच्या अटकेची मागणी करण्यात आली होती मात्र यंत्रणेने केवळ आश्वासन देत बोट चेपी धोरण कायम ठेवले यामुळेच तो समाज कंटक उजळ माथ्याने फिरत असावा हे यंत्रणेचे अपयश आहे ते झाकण्याचा प्रयत्न यंत्रणेने करू नये असे सकपाळ यांनी पत्रकात म्हटले आहे.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने २४ ऑक्टोबर ला मुंबई गोवा महामार्ग पूर्ण चक्क बंद केला होता तसेच केंद्रीय मंत्री मा रामदास आठवले साहेब यांनी खेड येथे जिजामाता उद्यान मधील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची भेट देऊन स्थानिक खेड पोलीस वरिष्ठ निरीक्षक तसेच पोलीस अधीक्षक यांच्या कडे मागणी केली सदर तपास सीबीआय कडे वर्ग करा अशी मागणी केली होती मात्र हा तपास बासनात गुंडाळून ठेवला आहे त्यामुळे हा प्रकार तितकाच निषेधार्थ आहे.

घटना घडल्या पासून येथील आंबेडकरी जनतेने संयम पाळला कायदा हातात न घेता प्रशासणाला सहकार्य केले मात्र प्रशास नाने त्यांच्या संयमाची परीक्षा पाहू नये तपास पुन्हा करावा नवनिर्वाचित पोलीस निरीक्षका निशा जाधव यांनी लक्ष घालून आरोपी च्या मुसक्या आवळाव्या असे आवाहन ही सकपाळ त्यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!