कणकवलीकोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसिंधुदुर्ग

◾शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कणकवली तालुका शिवसेनेतर्फे कणकवलीत रक्तदान शिबिर व सामाजिक संस्थांना थर्मल गन व ऑक्सिमिटरचे होणार वाटप..

 

◾उपजिल्हाप्रमुख राजु शेट्ये आणि अँड.हर्षद गावडे यांची माहिती..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : रविकांत जाधव

 🎴कणकवली, दि-२५:- शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक यांचा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात येणार असून कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे रक्तदान शिबीर शुक्रवार २६ मार्च २०२१ रोजी सकाळी ९ वाजता कणकवली शिवसेना शाखेत घेतले जाणार आहे. तसेच यावेळी कणकवली शहरातील सामाजिक संस्थांना थर्मल गन व ऑक्सिमिटरचे वाटप करण्यात येणार आहे.

तरी कणकवली तालुक्यातील जास्तीत जास्त शिवसैनिकांनी व नागरिकांनी कोरोनाचे सर्व अटी व नियम पाळुन रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेटये आणि सिंधुदुर्ग युवासेना माजी जिल्हाप्रमुख अँड.हर्षद गावडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!