◾गांजा वाहतूक केल्याप्रकरणी तिघे युवक ताब्यात ; एलसीबीची कारवाई
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर
🎴सिंधुदुर्गनगरी,दि-२४-: मुंबई-गोवा महामार्गावरुन दुचाकीने गांजा वाहतूक करणाऱ्या तीन युवकाना स्थानिक गुन्हा अन्वेषण पोलिसांनी हुमरमळा येथे पकडले आहे. बुधवारी सायंकाळी ही कारवाई करण्यात आली असून यात कणकवली येथील दोन युवक तर एक सोलापुर येथील असल्याचे समजते.
पोलीस उपनिरीक्षक शाहू देसाई, सचिन शेळके, सुधीर सावंत, गुरूनाथ कोयंडे, प्रमोद काळसेकर कृष्णा केसरकर, संदीप नार्वेकर, रवी इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगाकर, संकेत खाडे यानी ही कारवाई केली. कणकवलीहून कुडाळकडे जाणाऱ्या टू व्हीलर वरून २किलो ९४ ग्राम वजनाचा गांजा वाहतूक होत असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती. त्यानुसार कारवाई करीत ४१ हजार ५०० रुपये कीमतीचा गांजा ५० हजार रुपये किमतीची दुचाकी अशी कारवाई करण्यात आली आहे. यातील एक युवक अल्पवयीन असल्याचे समजते. पोलिसांची कारवाई सुरु असल्याने संशयितांची नावे समजू शकलेली नाहीत.

