◾सद्गुरु साटम महाराज यांची पुण्यतिथी उत्सव सेवेकरी व ट्रस्ट पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत साजरा होणार..
◾कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेम सावंत भोसले यांनी भाविकांना गर्दी न करता ज्या ठिकाणी असाल तेथूनच नमस्कार करण्याचे केले आवाहन..
◾संत शिरोमणी श्री समर्थ साटम महाराज पुण्यतिथी सोहळा शासन नियम पालन करून होणार..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी,दि-२४:- कोकणातील संतांचे संत शिरोमणी असलेले दाणोली येथील तीर्थक्षेत्र श्री समर्थ साटम महाराजांचा 84 वा पुण्यतिथी सोहळा मंगळवारी 30 मार्च रोजी होत आहे. परंतु सध्या कोविड १९ च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाच्या नियमांचे पालन करून यावर्षी साटम महाराजांचा पुण्यतिथी उत्सव ट्रस्टचे पदाधिकारी आणि सेवेकरी यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येणार असल्याचे सावंतवाडी संस्थांचे श्रीमंत तथा श्री समर्थ साटम महाराज समाधी मंदिर ट्रस्टचे मुख्य विश्वस्त खेम सावंतभोसले यांनी जाहीर केले आहे. शिर्डीच्या साईबाबांना समकालीन असलेल्या साटम महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्याला हजारो भाविकांची गर्दी होते.
त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीच यावर्षी पुण्यतिथी उत्सव साधेपणाने करण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्यतिथी सोहळ्याला भाविकांनी गर्दी न करता ज्या ठिकाणी असाल तेथूनच साटम महाराजांना नमस्कार करावा असे आवाहन श्रीमंत खेम सावंत भोसले यांनी केले आहे.

