कोकणमहाराष्ट्रराजकीयशासकीयसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾राष्ट्रवादीच्या दणक्यानंतर सावंतवाडी बसस्थानकाचे कर्मचारी लागले कामाला..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२४ :- तालुक्यातील बसस्थानकाची गेल्या कित्येक महिन्यांपासून दुर्दशा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकाला भेट देत गैरसोयी दुर करण्याची मागणी केली होती. परंतु आगार प्रमुख यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.
त्यामुळे आज आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन तेथील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यानंतर आज कनिष्ठ अभियंता गिरीजा पाटील यांनी सावंतवाडी बसस्थानकाची पाहणी केली. संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बसस्थानकाची दुर्दशा दाखवली.
त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सर्व कर्मचारी कामाला लागले व बस स्थानक स्वच्छ केले.
राष्ट्रवादीच्या या तडफदार कार्यकर्त्यांचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आभार मानले.

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२४ :- तालुक्यातील बसस्थानकाची गेल्या कित्येक महिन्यांपासून दुर्दशा झाली होती. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी बस स्थानकाला भेट देत गैरसोयी दुर करण्याची मागणी केली होती. परंतु आगार प्रमुख यांनी याकडे दुर्लक्ष केले होते.

त्यामुळे आज आक्रमक झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी संतप्त होऊन तेथील वरीष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. यानंतर आज कनिष्ठ अभियंता गिरीजा पाटील यांनी सावंतवाडी बसस्थानकाची पाहणी केली. संतप्त झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना बसस्थानकाची दुर्दशा दाखवली.

त्यानंतर अवघ्या अर्ध्या तासात सर्व कर्मचारी कामाला लागले व बस स्थानक स्वच्छ केले.राष्ट्रवादीच्या या तडफदार कार्यकर्त्यांचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!