आणखीकोकणरत्नागिरीराजकीय

मालदोलीतील तांबे कुटुंबियांना सामाजिक कार्यकर्त्यांची आर्थिक मदत

◼️दानशूर व्यक्तींना काँग्रेसचे शहराध्यक्ष लियाकत शाह यांचे मदतीचे आवाहन

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : संतोष पिलके

🎴 चिपळूण : दि. २४ मालदोली मोहल्ला येथील आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला गोठा, वगुरे यांच्या मालकाला चिपळुणातील सामाजिक कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन दुग्धव्यावसायिक तांबे यांना मंगळवारी आर्थिक स्वरूपात मदत केली . तसेच समाजातील सर्व स्तरातील दानशूर व सामाजिक काम करणाऱ्या व्यक्तींनी तांबे यांना विविध स्वरूपात मदत देऊन सहकार्य करण्याचे आवाहन माजी उपनगराध्यक्ष व काँग्रेस शहर अध्यक्ष लियाकत शाह यांनी केले आहे.

मागील आठवड्यात मालदोली मोहल्ला येथे दुपारच्या सुमारास एका गोठ्याला भीषण आग लागली. या आगीत पंधरा गुरांपैकी नऊ गुरे दगावली. संपूर्ण गोठा आगीत जळून खाक झाला. पंधरा गुरांपैकी सुमारे नऊ दुभती गुरे आगीमध्ये जळून खाक झाली. तर उर्वरित सहा गुरांना आगीची प्रचंड झळ बसली आहे. आगीतून बचावलेली ही गुरे मात्र आगीच्या झळांमुळे मोठ्या प्रमाणावर जखमी झाली आहेत.

गेली अनेक वर्षे तांबे हे मालदोली परिसरात दुग्ध व्यवसाय करीत आहेत. संपूर्ण गावात व वाडीत दूध पुरविण्याचे काम करीत आहेत. दरम्यान मागील आठवड्यात आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेल्या गोठ्यामुळे त्यांचा व्यवसाय पूर्णपणे बंद झाला आहे. तर दुसरीकडे जिवापाड प्रेम करून जपलेली दुभती जनावरे गोठ्याला लागलेल्या आगीत जळून गेल्याने, त्यांना झालेल्या प्रचंड दुःखामुळे ते सध्या मानसिक तणावाखाली आहेत. वाचलेली गुरेदेखील मोठ्या प्रमाणात जखमी झाल्याचे पाहून ही गुरे बरे होण्याची शक्यता नसल्याचे तांबे यांनी सांगितले.

तांबे यांना मानसिक व आर्थिक आधार देण्यासाठी चिपळुणातील सामाजिक कार्यकर्ते व न्यू इंडिया इन्शुरन्सचे विकास अधिकारी खालिद दलवाई, काँग्रेस शहर अध्यक्ष लियाकत शाह, उद्योजक अमजद मुकादम, इकबाल मुकादम, शकील चौगुले, यासीन दळवी, अशरफ मेमन, रईस अलवी आदींनी मालदोली येथे जाऊन तांबे यांना रोख रक्कम स्वरूपात मदत केली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!