◾”क्षय रोग आणि जागरुकता” या विषयावर आज सावंतवाडी जिल्हा उप रुग्णालयत बैठक संपन्न..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-२४ -: एकेकाळी “क्षय रोगाची व्याप्ती आणि भिती” आज सर्व जगभर थैमान घालणाऱ्या “कोरोना” या विषाणू सारखीच होती कारण हे दोन्ही आजार जनसंपर्कातुन फैलावतात. पण “क्षय रोगावर” योग्य उपचार पद्धती उपलब्ध असल्याने रुग्ण योग्य उपचारा नंतर पुर्ण पणे बरा होऊ शकतो असे उदगार रोटरी-क्लब-सावंतवाडीचे अध्यक्ष रो.डॉ.राजेश नवांगुळ यानी आज जिल्हा उप रुग्णालयात आयोजित केलेल्या “क्षय रोग आणि जागरुकता” या विषयावर बोलताना काढले. “जागतिक-क्षय-दिन” निमित्य आयोजित केलेल्या छोटेखानी कार्यक्रमात जिल्हा उप रुग्णालयचे मुख्य वैधकीय अधिकारी डॉ.उत्तमराव पाटील यानी क्षय रोगाची व्याप्ती सांगितली पण आज हा आजार लवकर शोधुन त्यावर उपचारही पुर्ण मोफत उपलब्ध असल्याने या आजाराची भिती कमी आहे. परंतु या आजाराची लक्षणे जाणवताच त्याची चिकित्सा होणे गरजे आहे असे ते म्हणाले.
यावेळी रुग्णालयाचे अडॉ.वजराटकर, रो.डॉ. अभिजित चितारी, डॉ.ज्ञानेश्वर दुरभाटकर, डॉ.चौगुले, डॉ हर्शल जाधव – जिल्हा क्षय अधिकारी,डॉ. संदिप सावंत, स्वप्निल गवस लॕब सुपरवाययझर तसेच रोटरी क्लबचे सचिव रो.दिलीप म्हापसेकर, रो.प्रमोद भागवत, रो.सत्यजित धारणकर, रो.टी.व्हि.पाटील, रो.वसंत करंदीकर आणि सौ.विद्याताई करंदीकर उपस्थित होत्या. रोटरी क्लबच्या वतीने यावेळी जिल्हा उप रुग्णालययातील सर्व रुग्णाना केळी आणि शेंगदाण्याच्या लाडू वाटण्यात आले. रोटरी क्लबचे सचिव रो.दिलीप म्हापसेकर यानी उपस्थितीताचे आभार मानले.

