आरोग्यकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾कोलगा मध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची महेश सारंग यांची मागणी..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : राहुल गायकवाड

🎴सावंतवाडी,दि-२४:- सध्या सिंधुदुर्गात कोरोना लसीकरण जोरात सुरु आहे. त्या त्या ठिकाणच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात ही लसीकरण मोहीम राबविलीय जातेय. अशात वयोवृद्धांना, आजारी माणसांना ठिकाण लांब असल्याने तिथ पर्यंत जाण शक्य होत नाही. त्यामुळे अशा व्यक्तींना अडचणींचा सामना करावा लागतो. कोलगावातही काहीशी अशीच परिस्थिती आहे. कोलगाववासियांना लसीकरणासाठी सांगेली येथील प्राथ. आरोग्य केंद्रात जावं लागतं. हे अंतर जास्त असल्यानं येथील वयोवृद्धांना प्रवास करण शक्य होत नाही, ही अडचण लक्षात घेत भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग यांनी कोलगावात कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिपे यांच्याकडे पत्राद्वारे केलीय.

पत्रात ते म्हणाले, कोलगांव गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र सांगेली हे अंतर २० की.मी. एवढे आहे. या ठीकाणी जाणे-येणे ६० वर्षे वरील वयोवृध्द व्यक्तीना शक्य नसल्याने तसेच भौगोलीक परीस्थीतीचा विचार करता एवढया अंतरावर वयोवृध्द व्यक्ती जाऊ शकत नाही. यासाठी कोवीड लसीकरण केंद्र कोलगांव या ठीकाणी सुरू करणेत यावे. या कोविड लसीकरण केंद्रामुळे कोलगांव, कुणकेरी, आंबेगांव, कारीवडे गावातील लोकांना फायदा होणार आहे. या गावांची लोकसंख्या कोलगांव -६०९४, कुणकेरी १४५७, आंबेगांव -११२३, कारीवडे – ३५९५ एकूण १२२६९ एवढी आहे. कोविड लसीकरण केंद्रासाठी आवश्यक जागा उपकेंद कोलगांव ही असून त्यासाठी इंटरनेट सुविधा, आवश्यक इतर सुविधा ग्रामपंचायतकडून पुरविण्यात येतील.

कोलगावात हे कोरोना लसीकरण केंद्र सुरु झाल्यास त्याचा फायदा अनेकांना होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!