शिवसेनेसह भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी अखेर भाजपच्या संजना सावंत विजयी
🖥️ Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : सुनिल आचरेकर
🎴 सिंधुदुर्गनगरी : दि. २४ शिवसेनेसह भाजपाने प्रतिष्ठेच्या केलेल्या जिल्हा परिषद अध्यक्षपदी अखेर भाजपच्या संजना सावंत विजय झाल्या आहेत. तर शिवसेनेच्या वर्षा कुडाळकर यांना पराभव सहन करावा लागला. ३० विरुद्ध १९ अशा मतदान प्रक्रियेत हात उंचावून ही निवड प्रक्रिया पार पडली. या पदासाठी भाजपसह शिवसेनेने जोरदार मोर्चेबांधणी केली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात नारायण राणे यांनी आपला गड कायम राखला आहे.

