चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचच्या वतीने लवकरच चिपळूणात सामूहिक विवाह सोहळा…
🖥️ Kokan Live Breaking News
✍️ प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴 चिपळूण : दि. २४ तालुका मुस्लिम विकास मंच यांची स्थापना झाल्यानंतर ती अनेकांच्या पसंतीस उतरू लागली आहे समाजाच्या हिताच्या दृष्टीने कामकाज करण्याचा उद्देश नजरेसमोर ठेऊन काम करत आहे. त्यामुळे चिपळूण मध्ये लवकरच सामूहिक विवाह सोहळा घेण्याची संकल्पना अद्यक्ष अन्वर पेचकर यांची असून त्यादृष्टीने व्यूहरचना करण्यात येत आहे.
आज आपण पाहिले तर लग्नसमारंभ लाखो रुपये खर्च केले जातात आणि जास्तीत जास्त याचे उदाहरण मुस्लिम समाजात दिसून येते. त्या खर्चावर नियंत्रण येणे काळाची गरज आहे, कारण आजची परिस्थिती पाहता मग गरीब असो श्रीमंत लग्न समारंभात खर्च करणे न परवडण्यासारखे झाले आहे आणि इस्लाम मध्ये फिजुल खर्च करायचेच नाहीत त्यामुळे चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंचचे अद्यक्ष अन्वर पेचकर यांनी सामूहिक विवाहाची संकल्पना सर्वांच्या नजरेसमोर आणली आहे. यामध्ये मुस्लिम समाजातील तरुण तरुणी यांचा विवाह सामूहिक पध्दतीने शरियत नुसार करण्यात येणार आहे आणि डिसेंबर महिन्यात हा कार्यक्रम चिपळूण येथे होणार आहे.
चिपळूण तालुका मुस्लिम विकास मंच यांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात सहभागी होणाऱ्यानी अद्यक्ष अन्वरभाई पेचकर संपर्क क्रमांक ( 9209887566) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन प्रवक्ते निसार शेख यांनी केले आहे .

