आणखीकणकवलीकोकणसामाजिकसिंधुदुर्ग

महागाईचा भडका सांगा कसं जगायचं…

◼️महागाईचा भडका उडाल्याने ग्रामीण भागातील मजूर शेतकरी हैराण

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : सुनील आचरेकर

🎴सिंधुदुर्ग : दि. २४ एकीकडे कोरोना ने जगण्याची घडी विस्कटली आणी महागाईच्या भडक्याने जगण्याचा संघर्ष सुरू झाला आहे. रोजगार गेले व्यवसाय ठप्प झाले यातून मिळणारी तुटपुंजे उत्पन्न हातचे गेले. मग या महागाईत मार्ग काढणार तरी कसा? असा प्रश्न सर्वसामान्यांनसमोर निर्माण झाला आहे. गेले वर्षभर कोरोना महामारी ने सारेच अर्थकारण कोलमडले आणि सर्वसामान्य माणसाचे जगणे असह्य झाले यातून आता हळूहळू अर्थकारण पूर्वपदावर येत असताना सर्वच बाबतीत महागाईचा भडका उडाला आहे पेट्रोल, डिझेल ,गँस , धान्य, किराणा, भाजीपाला, औषधे सारेच महागल्याने सर्वसामान्यांचे बजेट पूर्णपणे कोलमडले असून या वाढत्या महागाईत जगायचे तरी कसे असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. खाद्यतेलाच्या किमतीने दिवसेंदिवस उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य शेतकरी वर्ग ग्रामीण भागातील मजूर हा महागाईचा भडका उडाल्याने हैराण झालेला असून यांच्या दैनंदिन जीवनावर महागाईचा भडका उडाल्याने मोठा परिणाम जाणवत आहे .सर्वसामान्य कुटुंबातील जीवन विस्कळीत झाले असून गरीब मजूर हातावरचे पोट असणाऱ्या लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

या सर्व गोष्टीला जबाबदार कोण? कृत्रिम महागाई निर्माण केली का मानवनिर्मित महागाई आहे नेमकं याच्या पाठीमागे कोण आहे .नेमके कुठल्या कारणामुळे खाद्य तेलाचे दर गगनाला भिडले आहेत हे सर्वसामान्य जनतेला कळायला मार्ग नाही. पेट्रोलच्या दरात भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जीवन विस्कळीत झाले असून गरिबांचे मात्र कंबरडे मोडले आहे त्या महागाई खूप मोठा परिणाम सर्वसामान्य शेतकरी आणि मजूर लोकांवर होत आहे . २०२० वर्ष उजाडले ते कोरोना महामारी ते संकट घेऊन या महामारीने जगभरात हाहाकार उडवला भारतात हजारो लोकांचे बळी घेतले आणि सारे अर्थकारण बिघडून टाकले आणि उद्योग धंदे व्यवसाय बंद झाले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या अनेक जण बेकार झाले कोरोना तून कोलमडलेले अर्थकारण आता कुठे सावरत असताना महागाईचा मात्र कडेलोट झाला आहे.

गेल्या काही महिन्यापासून पेट्रोल-डिझेलच्या किमती मध्ये सातत्याने वाढ होत आहे गेल्यावर्षी ७० ते ८० रुपये प्रति लिटर असणारे पेट्रोलचे दर आता १००नजीक पोचले आहेत डिझेलचे दरही याच मार्गावर आहेत गेल्या वर्षभरात लिटर मागे पेट्रोल दरात सरासरी १८ रुपये तर डिझेलच्या दरात १५ रुपयांची वाढ झाली परिणामी मालवाहतुकीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे .त्यामुळे भाजीपाला ,किराणा आधीच वाहतूक दर वाढल्याने महागाईचा भडका उडाला आहे. तेल कंपन्यांकडून इंधन दरात मोठी वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीचा परिणाम बाजारपेठांवर झाला असून जीवनावश्यक वस्तूंचे भाव २० ते २५ टक्के कडाडले आहेत. त्यामुळे गृहिणींचे बजेट कोलमडले आहे डाळी खाद्यतेल मिरचीचे भाव गगनाला भिडले आहेत.

या वर्षीचे दर पाहता या वर्षी मिरचीच्या दरात जवळपास १०० रुपयांनी वाढ झाली आहे खाद्यतेले लिटरमागे १५०रुपये पर्यंत पोहोचले आहे नारळाचे भावही चांगलेच वधारले आहेत. बेसन कांदा आणि तेल महागल्याने कांदाभजी दुरापास्त झाली आहे. जेवणात तील कांदाही कधीच गायब झाला आहे. गॅसचे दर वाढल्याने सर्वसामान्य आता पुन्हा चूलीकडे वळण्याची वेळ आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!