◾ सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी द्वारे “निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबीराचे” करण्यात आले होते आयोजन..
◾ शिबीराला नागरीकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रशांत मोरजकर
🎴सावंतवाडी,दि-२३:- ग्रामीण भागातील जनतेला शहरातील तज्ञ डॉक्टर्स ची सेवा उपलब्ध व्हावी तसेच गरजू रुग्णांना त्यांच्या सेवेचा लाभ व्हावा, या उद्देशाने सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडी द्वारे मांडवफातरवाडी, ओटवणे येथे “निःशुल्क रोगनिदान व चिकित्सा शिबीर” आयोजित करण्यात आले. श्री सती देवी युवक कला क्रीडा मंडळ, ओटवणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या या शिबिराचा लाभ महिलांसह १५५ आबालवृद्धांनी घेतला.
या शिबिरात शल्यचिकित्सक डॉ शंकर सावंत, अस्थिरोग तज्ञ डॉ रेवणसिद्ध खटावकर, स्त्रिरोग तज्ञ डॉ धिरज सावंत, बालरोग तज्ञ डॉ संदीप सावंत, मधुमेह व हृदयरोग तज्ञ डॉ नंदादीप चोडणकर, नेत्र रोग तज्ञ डॉ विशाल पाटील, डॉ मुग्धा ठाकरे, डॉ अजित मठकर व डॉ प्रविणकुमार ठाकरे या तज्ञ डॉक्टर्सनी रुग्णांची तपासणी केली.
याशिबिरात रक्तगट, हिमोग्लोबिन, शुगर, बोन मिनरल डेनसीटी ई. तपासणी निःशुल्क करण्यात आल्यात. आवश्यक औषधे रुग्णास मोफत देण्यात आली.
सामाजिक अंतर, सॅनिटाइझर चा वापर यावेळी करण्यात आलाच शिवाय प्रत्येक रुग्णास मास्क देखील देण्यात आले. कोरोना त्रिसूत्रीचे पालन यावेळी करण्यात आले.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान चे दिपक गावकर, भार्गवराम शिरोडकर, संतोष नाईक, प्रशांत कवठणकर, वेलांकिनी कार्डोस, स्टीव्हन कार्डोस, आनंद मेस्त्री, असिफ शेख, सिद्देश मणेरीकर, रवी जाधव, सीए लक्ष्मण नाईक, भगवान रेडकर, अँड्र्यू फर्नांडिस व गुरुनाथ राऊळ यांनी परिश्रम घेतले. याशिवाय श्री सती देवी युवक कला क्रीडा मंडळाचे अध्यक्ष श्री राजाराम वर्णेकर यांचेसह समस्त कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या शिबिराच्या लाभार्थ्यांनी या निःशुल्क रक्त तपासणी, तज्ञांचा सल्ला व औषधोपचाराबाबत समाधान व्यक्त करून प्रतिष्ठान चे आभार व्यक्त केले.

