कृषिकोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ काजुला योग्य भाव मिळण्यासाठी आज दुसऱ्यांदा प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली ; बैठकीत व्यापारी कारखानदार पुन्हा एकदा अनुपस्थित..

 

◾ कारखानदार व व्यापारी यांना शेतकऱ्यांचे हित नको ; वसंत केसरकर यांचा कारखानदार व व्यापारी यांच्यावर आरोप..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी,दि-२३:-  काजुला योग्य भाव मिळण्यासाठी आज दुसऱ्यांदा येथील प्रांताधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत व्यापारी कारखानदार पुन्हा एकदा अनुपस्थित राहिले असून, यावरून कारखानदार व व्यापारी यांना शेतकऱ्यांचे हित नको आहे. त्यांना संगनमताने शेतकऱ्यांचा काजू पाडून घेण्याचा डाव आखला असल्याचा आरोप सिंधुदुर्ग जिल्हा शेतकरी संघटनेचे अध्यक्ष वसंत उर्फ अण्णा केसरकर यांनी केला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील शेतकरी काजू बागायतदारांना योग्य दर मिळावा यासाठी गेले काही दिवस शेतकरी संघटनांकडून प्रयत्न सुरू आहे सुरुवातीला दोडामार्ग शेतकरी बागायतदार संघटनेकडून यासंदर्भात येथील प्रांत अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार व्यापारी व शेतकरी यांची संयुक्त बैठक आयोजित केली होती मात्र या बैठकीला कारखानदार व व्यापारी अनुपस्थित राहिल्याने दर निश्चिती बाबत काहीच निर्णय ाला नव्हता मात्र त्यासंदर्भात प्रांताधिकार्‍यांनी पुन्हा बैठक घेण्याचे सांगितले होते सदरची बैठक आज आयोजित करण्यात आली होती मात्र आजच्या बैठकीला हे कारखानदार व व्यापाऱ्यांनी अनुपस्थिती दाखवून एक प्रकारे प्रांताधिकारी यांचे आदेश धुडकावून लावले.

या बैठकीनंतर अण्णा केसरकर यांनी पत्रकार परिषद घेऊन शेतकरी संघटनेच्या वतीने भूमिका स्पष्ट केली ते म्हणाले फळ प्रक्रिया उद्योगावरील जीएसटी बारा टक्‍क्‍यांवरून सहा टक्क्यावर आणली, कारखानदार व्यापाऱ्यानी यासाठी आवाज उठवुन जीएसटी कमी करुन घेतली, मात्र शेतकरी बागायतदार योग्य दर मिळावा यासाठी आवाज उठवू नये शासन काहीच करताना दिसून येत नाही आहे त्यामुळे भविष्यात तरी काजु ला योग्य दर मिळावा यासाठी शासनाने शेतकरी बागायतदार यांच्या पाठीशी उभे राहावे तसेच लोकप्रतिनिधी ने यामध्ये जातीनिशी लक्ष घालावा ज्याप्रमाणे कारखानदार व्यापारी यांना शासन सवलती देत आहे त्याप्रमाणे शेतकऱ्यांना आहे योग्य दर द्यावा यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

श्री केसरकर पुढे म्हणाले, आज प्रत्येक तालुक्यामध्ये खरेदी विक्री संघ तसेच कंज्युमर्स सोसायटी आहेत, शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा या सोसायट्यांचा मुख्य उद्देश असताना तसा प्रयत्न या ठिकाणी होताना कुठे दिसून येत नाही त्यामुळे या सोसायट्यांनी शेतकऱ्यांसाठी यापुढे तरी काम करावं, आज शेतकऱ्यांच्या काजूला दर मिळत नसल्याने लवकरच घाटमाथ्यावर ज्याप्रमाणे शेतकऱ्यांचा माल उत्पादक करणारी सोसायटी आहे त्याप्रमाणे सिंधुदुर्गातही लवकरच सोसायटी निर्माण करण्यापर्यंत आम्ही पोहोचलो आहोत.तर शासन तसेच लोकप्रतिनिधी येणे काजू उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी योग्य तो तोडगा काढावा अन्यथा हा आगामी निवडणुकांमध्ये याचे पडसाद नक्कीच दिसून येतील.

बैठकीला माजी नगरसेवक सुरेश भोगटे, बाळा सावंत बाबल आल्मेडा आदी शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!