बांदा शहरातील सटमट वाडी येथे मृत माकड सापडले…
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : शैलेश गवस
🎴बांदा : दि. २३ शहरातील सटमटवाडी येथे काजूच्या बागेत मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सटमटवाडी हे माकडताप बाधित क्षेत्र असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी मृत माकडाची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ मृत माकडाची विल्हेवाट लावली.
तीन वर्षांपूर्वी सटमटवाडीत माकडतापाने हाहाकार माजविला होता. दोन वर्षात १५ हुन अधिक जणांचा माकडतापाने बळी घेतला होता. तसेच या परिसरात शेकडो माकडे मृतावस्थेत आढळली होती. त्यामुळे येथील नागरिक हे भीतीच्या छायेखाली वावरत होते. येथील शेतकऱ्यांनी माकडतापाच्या भीतीने काजू बागायतीत काजू गोळा करण्यासाठी जाणे देखील सोडून दिले होते.
यावर्षी मृत माकड मिळण्याची ही पहिलीच घटना आहे. शनिवार दिनांक २० रोजी काजू बागायतीत काजू गोळा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना मृत माकड दृष्टीस पडले. त्यांनी तात्काळ याची कल्पना आरोग्य विभाग व बांदा ग्रामपंचायत प्रशासनास दिली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत मृत माकडाची विल्हेवाट लावली. मात्र माकडाचा मृत्यू कशामुळे झाला हे कळू शकले नाही. फेब्रुवारी महिन्यात बांदा आरोग्य विभागाने सटमटवाडीतील शेतकऱ्यांना डीएमपी ऑइलचे वाटप केले होते. मृत माकड सापडलेल्या परिसरात दूषित गोचिडींचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मेलेथीन पावडरची फवारणी आरोग्य विभागाकडून करण्यात आली.
शेतकऱ्यांनी काजू बागायतीत जाताना अंगाला डीएमपी ऑइल लावूनच काजू गोळा करण्यासाठी जावे, तसेच बागायतीतून घरी आल्यावर आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
बांदा शहरातील सटमटवाडी येथे काजूच्या बागेत मृत माकड सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सटमटवाडी हे माकडताप बाधित क्षेत्र असल्याने स्थानिक शेतकऱ्यांनी मृत माकडाची माहिती प्रशासनाला दिल्यानंतर आरोग्य विभाग व ग्रामपंचायत प्रशासनाने तात्काळ मृत माकडाची विल्हेवाट लावली.