आणखीकुडाळकोकणराजकीयसिंधुदुर्ग

पिंगुळी म्हापसेकर तीठा येथील रेशनिंग दुकानदाराला उद्धट वागणं पडलं महागात…

🖥️Kokan Live Breaking News

✍️प्रतिनिधी : गणेश तोडकर

🎴कुडाळ : दि. २३ मनसे उपाध्यक्ष दीपक गावडे आणि ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे यांच्,या कानावर प्रकरण जाताच मनसे स्टाईल ने दिला दुकानदाराला दणका. कुडाळ/-सद्य स्थितीत रेशनिग चे नवीन फॉर्म भरण्याचे काम रेशनिग दुकानात रीतसर सुरू आहे.कुडाळ पिंगुळी म्हापसेकर ती ठा येथे असलेल्या रेशनिंग धान्य दुकानावर एका महिलेशी दुकानदराने उद्धट भाषा वापरून तिचा अपमान केला.आणि आजच नाही तर सर्वच महिलांशी हा दुकानदार अश्या च प्रकारे वागतो. यावेळी ही गोष्ट मनसे च्या काही कार्यकर्त्यांनी उपाध्यक्ष दीपक गावडे यांच्या कानावर घातली त्यावेळी घटनास्थळी ग्रामपंचायत सदस्य बाबल गावडे,यांनी रेशनिंग दुकानदारला मानसे स्टाईल ने चांगलंच फटकारल.आणि यावपुढे कुठल्याही महिलेस किंवा व्यक्तीला असा उद्धटपणा केल्यास मनसे स्टाईल ने उत्तर देऊ अशी सक्त ताकीद दिली.

नेहमीच महाराष्ट्र नवं निर्माण सेना ही महिला भगिनी आणि सामान्य नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते त्यामळे अश्या प्रकारची घटना तर अश्या सांजकांटकला मनसे वेळीच धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही असेही गावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!