भारतीय जनता पार्टी चे ” समर्थ बुथ , सशक्त शक्तिकेंद्र अभियान- प्रसंन्ना ऊर्फ बाळु देसाई , जिल्हा सरचिटणीस
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 :वेंगुर्ले*
महाराष्ट्र प्रदेश भाजपा च्या वतीने संपूर्ण राज्यात २० मार्च ते २५ मार्च या कालावधीत ” समर्थ बुथ , सशक्त शक्ती केंद्र ” या अभियान अंतर्गत चौक सभेचे आयोजन करण्यात आले आहे . सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जिल्हाध्यक्ष राजन तेली व बुथ अभियान संयोजक महेश सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील १४ मंडलातील २०९ शक्ती केंद्रावर हे अभियान राबविण्यात येणार आहे .
*प्रत्येक चौकसभेत सरकारच्या अपयशाचा पाढा वाचला जाणार*
यावेळी प्रत्येक शक्ती केंद्रामधील बुथप्रमुख व बुथ समिती तसेच मतदारांना एकत्रित करून महाविकास आघाडी सरकारच्या अन्याय , अत्याचारी व निष्क्रीयतेच्या विरोधात प्रत्येक शहरात , गावात व चौकात चौकसभा घेऊन शासनाच्या विरोधात जनजागृती करण्यात येणार आहे .
तसेच महाराष्ट्राला सर्व बाजूंनी संकटात ढकलणारया आघाडी सरकारचा निषेध करुन कोणताही समन्वय नसलेल्या आणि विकासाच्या तळमळीचा पुर्ण अभाव असलेल्या राज्यातील सत्ताधारी शिवसेना – काँग्रेस – राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडी सरकारच्या बेबंद कारभारामुळे महाराष्ट्र राज्य सर्व बाजूंनी संकटात सापडले आहे . राज्यात असुरक्षिततेचे व निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे . राज्याला संकटात टाकणारया महाविकास आघाडी सरकारचा अशा चौकसभेत निषेधाचा ठराव घेतला जाणार आहे .
महाविकास आघाडीने कोरोनाचा सामना करताना कमालीचा ढीसाळपणा दाखविल्यामुळे राज्यावर कोरोनाचे संकट नव्याने ओढवले आहे . राज्यात महिलांवरील अत्याचाराची समस्या गंभीर झाली आहे .महिलांवरील विशेषतः अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत . कोविड सेंटरमध्येही बलात्कार व विनयभंगाच्या घटना घडत आहेत . पुजा चव्हाण या एका निष्पाप तरुण मुलीच्या अपमृत्युबाबत अनेक पुरावे समोर आल्यामुळे नुकताच राज्याच्या एका मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला .त्याचप्रमाणे सरकारने शेतकरयांनाही वारयावर सोडले आहे .अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरयांना हेक्टरी २५००० रु. ची मदत देऊ हे बांधावर जाऊन दिलेलं आश्वासन मुख्यमंत्री सोयीस्कर पणे विसरले . मराठा समाजाच्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाकडुन मिळालेली स्थगिती असो किंवा ओबीसींच्या मनात मंत्र्यांनीच निर्माण केलेली अस्वस्थता असो, तसेच लाॅकडाऊन नंतर राज्यातील जनतेला मिळालेली भरमसाठ बीले असो . परंतु वीजबीलाच्या बाबतीत सरकारने काहीच दिलासा दिला नाही, उलट शेतकरयांसह लाखो सामान्य नागरिकांना वीज जोडणी तोडण्याच्या नोटीसा पाठविल्या . अशा प्रकारे महाविकास आघाडी सरकारचा बेफिकीर कारभार जनतेसमोर उघड करण्यात येणार आहे .
कोरोना महासाथीच्या संकटावर मात करण्यासाठी मान.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी सामान्य जनतेच्या साथीने अत्यंत धैर्यानं देशाचे प्रभावी नेतृत्व केले तसेच या संकटातून देशाला बाहेर काढून प्रगतीच्या मार्गावर नेण्यासाठी आत्मनिर्भर भारत अभियान सुरु केले .या ऐतिहासिक कामगिरीबद्दल चौकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा अभिनंदनाचा ठराव घेण्यात येणार आहे .
कोरोनावर संपुर्ण विजय मिळविण्याच्या दिशेनं देशाची वाटचाल होत आहे .पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वैद्यकीय क्षेत्रातील शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून दोन भारत निर्मित लसी उपलब्ध करण्यात यश मिळविले . कोरोनाच्या महामारीतुन बाहेर पडणारया भारतासमोर आत्मनिर्भर भारत उभारण्याचे उद्दीष्ट सादर करुन पंतप्रधानांनी देशाच्या स्वावलंबनाच्या बाबतीत नवे ध्येय ठेवले व २० लाख कोटीचे पॅकेज जाहीर केले . आत्मनिर्भर पॅकेजने देशाच्या सर्व क्षेत्राना स्पर्श केला आणि त्यामध्ये अर्थकारण , पायाभूत सुविधा , व्यवस्था ,लोकसंख्या आणि मागणी अशा सर्व बाबींसाठी तरतुदी करण्यात आल्या . अशा सर्व विषयांचा उहापोह या चौकसभेमध्ये करण्यात येणार आहे .
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

