महाराष्ट्रमुंबईराजकीयशासकीय

◾ मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी गृहमंत्र्यावर केलेले आरोप खोटे..

 

◾ पोलीस आयुक्तांनी दिलेल्या भेटीच्या तारखेला गृहमंत्री होते रुग्णालयात..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे

 मुंबई,दि-२२ :-   मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून (Param Bir Singh Letter) गृहमंत्री अनिल देशमुख (Home Minister Anil Deshmukh) यांच्यावर गंभीर आरोप करत देशभर खळबळ उडवून दिली. ‘अनिल देशमुख यांनी मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांना दरमहिना १००कोटी रुपये वसूल करण्यास सांगितलं होतं,’ असा गौप्यस्फोट परमवीर सिंह यांनी केला. त्यांच्या या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याचीही मागणी होत आहे. मात्र परमवीर सिंह यांनी आरोप करताना अनिल देशमुख यांच्याबाबत केलेल्या एका दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी काही कागदपत्रे CNN News18च्या हाती लागली आहेत.

परमवीर सिंह यांच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना मुंबईत भेटायला बोलावलं. मात्र ज्या दिवशी सचिन वाझे यांना देशमुख यांनी भेटण्यासाठी बोलावल्याचा दावा परमवीर सिंह यांनी केला आहे, त्या दिवशी अनिल देशमुख स्वतः नागपूरच्या एका रुग्णालयात उपचार घेत होते आणि कोरोनाची लागण झाल्याने विलगीकरणात होते, असं उपलब्ध झालेल्या कागदपत्रांतून स्पष्ट होत आहे. तसंच त्यावेळी देशमुख यांची तब्येत बरी नव्हती आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत असल्याचं वैद्यकीय अहवालातून समोर आलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!