कणकवली पटवर्धन चौक येथे रस्त्यावर पडलेले पैसे त्या व्यक्तीच्या ताब्यात…
🖥️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज
✍️प्रतिनीधी : रविकांत जाधव
🎴कणकवली : दि. २२ पटवर्धन चौक येथे रस्त्यावर पैसे पडलेले तीन व्यक्तींना भेटले होते, ते त्यांनी प्रामाणिकपणे पोलिस स्टेशनमध्ये जमा केले होते. सदर रक्कम सचिन कुवळेकर, महेश मोरे, राजु पेडणेकर यांना भेटली होती.
दिनांक १९ रोजीची घटना, सकाळी १० किंवा ११ च्या दरम्यान हि रक्कम मिळाली. सदर रक्कम ६२०० रू पडलेले, पण त्यातले १०० रू कोणीतरी उचलले. तिला परत ६१०० रू मिळाले असे समजले आहे. आज त्यांची सर्व माहिती विचारून, त्यांची चौकशी करण्यात आली, ओळख पटली. त्यानंतर त्यांच्या ताब्यात ती रक्कम कणकवली पोलिसांनी सुपुर्त केली. जिचे पैसे गेले तिचं नाव सौ. नमिता संदिप बावलेकर रा. रानबांबुळी असे आहे.
पोलीस हवालदार श्री. सावंत, महीला पो. हवालदार सौ. जाधव, महीला पो. सौ. नाईक (माने) यांनी त्या व्यक्तीला त्यांचे पैसे त्यांच्या ताब्यात दिले. कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलला आज सायंकाळी ७.३० च्या सुमारास त्यांनी पैसे घेऊन गेले असे सांगण्यात आले.
हि रक्कम ज्याची कुणाची असेल, त्यांनी ओळख सांगुन घेऊन जाणे. अशी विनंती सचिन कुवळेकर, महेश मोरे, राजु पेडणेकर यांनी कोकण लाईव्हशी बोलताना सांगितलं होत. रक्कम घेऊन गेल्यास, याची सुचना कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज, कणकवली प्रतिनीधी – रविकांत जाधव, संपर्क : ९४२२५१५७१४ वर फोन करून सांगणे, असं सांगण्यात आलं होत. सदरची बाब कणकवली पोलिस स्टेशन मधुन कळवली आहे.
कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलने सर्व प्रथम याची दखल घेतली, म्हणुन मोल – मजुरी करणाऱ्या त्या व्यक्तीचे पैसे तिला परत भेटले. त्यामुळे कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्युज चॅनलचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

