आता तुम्हीच व्हा तुमच्या कंपनीचे मालक……….माणगाव खोरे बांबू प्रोडूसर कंपनीचे शेतकऱ्यांना आवाहन
*🖥️ Kokan Live Breaking News*
*✍🏻 प्रतिनिधी :त्रिविक्रम सावंत*
*🎴 :माणगाव*
*नाबार्ड आणि लुपिन फाउंडेशन चा संयुक्त उपक्रम*
हिरवे सोने म्हणून कोकणात प्रसिद्ध असणाऱ्या माणगा बांबू हे पिक गवत वर्गातील असून कोकणातील शेतकऱ्याला त्यापासून फार मोठे उत्पन्न मिळते . येथील शेतकऱ्यांच्या प्रत्येक शेतीत बांबूची किमान एक-दोन तरी बेट असतात. येथील हवामान व जमीन या पिकासाठी अतिशय पोषक आहे .पण कोकणात या पिकाकडे फार मोठे दुर्लक्ष केले जाते भात नारळ सुपारी या पिकांची जशी जपणूक शेतकऱ्यांकडून केली जाते तशा पद्धतीची बांबूची देखभाल व जपणूक केली जात नाही. व्यावसायिक दृष्टिकोनातून या पिकाची लागवड फार कमी प्रमाणात केली जाते. मात्र कोकणातील माणगा याप्रकारच्या बांबूला जागतिक स्तरावर फार मोठी मागणी आहे. वानर ,डुक्कर ,गवेरेडे या जंगली प्राण्यांपासून या पिकासाठी फार मोठा धोका उत्पन्न होतो. मात्र पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारे कोंब वाचवून त्याचे रक्षण केल्यानंतर इतर कुठल्याही प्रकारची देखभाल करावी लागत नाही. किंवा खते द्यावी लागत नाही आज या पिकासाठी व्यापार्यांकडून देण्यात येणाऱ्या दरामध्ये विविध ठिकाणी यामध्ये फार मोठी तफावत आढळते. तसेच उत्पादक शेतकरी संघटित नसल्यामुळे बरेचदा शेतकऱ्यांचे नुकसान होते. मात्र माणगाव खोरे बांबू उत्पादक कंपनीकडून शेतकऱ्यांना या कंपनीचे सभासद करून सभासद असणाऱ्या शेतकऱ्यांच्या बांबूला योग्य दर देऊन या बांबू पासून अगरबत्ती काडी तयार करणे ,बांबू क्युरिंग करणे बांबूच्या टाकाऊ भागा पासून कोळसा तयार करणे तसेच बांबू पासून फर्निचर बनवणे, शोभेच्या वस्तू व कागद कारखान्यासाठी लागणारा लगदा बनवणे असे उद्योग स्थानिक पातळीवरच निर्माण करण्याचे ध्येय या कंपनीचे असून पर्यटनासाठी लागणारी उत्पादने निर्यात करण्याचे ध्येय या कंपनीचे आहे या कंपनीचे सभासद होणाऱ्या शेतकऱ्यांना याचा फार मोठा लाभ होणार असल्याचा मनोदय कंपनीकडून व्यक्त करण्यात आला असून जास्तीत जास्त बांबू उत्पादक शेतकऱ्यांनी या कंपनीचे सभासद व्हावे असे आवाहन कंपनीच्या संचालक मंडळाकडून करण्यात आले आहे ज्या शेतकऱ्यांना कंपनीचे सभासद व्हायचे असेल त्यांनी खालील नंबर वर संपर्क करावा
9421144980
9422079440
*🥣 सयाजी रेस्ट्रो फॅमिली रेस्टॉरंट🍜*
🏠.. सावंतवाडी शहरात आम्ही घेऊन आलो आहोत खास तुमच्यासाठी *कोल्हापुरी जेवणाची मेजवानी.*
🟣कोल्हापूरची चवच न्यारी *तांबडा पांढरा रस्सा लय भारी..*🥣🫕
*🟤आमच्या येथे -*
*गरम पेये-*☕ 🫖🍵
*थंड पेये-*🍦🍧🧃
सकाळचा ब्रेकफास्ट आणि स्नॅक्स 🍔🥪🍜
*सयाजी स्पेशल..* कोल्हापुरी मिसळ थाळी🥘🍞🍴
*🟤जेवण विशेष आकर्षक थाळी मध्ये🟤*
🐓सयाजी स्पेशल *मुर्ग महाराजा थाळी🍲*
🥟सयाजी स्पेशल *मटन महाराजा थाळी🍛*
मटन थाळी-🫕
चिकन थाळी-🍲
अंडा थाळी-🍛
*कोल्हापुरी व्हेज थाळी*🥬🥒🍆🌶️🫑🍲
🐓चिकन फ्राय🍲
🥠 मटन फ्राय🫕
🫓चपाती भाजी
🥘भाजी भाकरी
*♦️तसेच विशेष फॅमिली कॉम्बो पॅक मध्ये♦️* कमीत कमी दहा (१०) लोकांसाठी
*🥘सयाजी स्पेशल मटण -*🥘 मटन सुक्का तांबडा रस्सा पांढरा रस्सा वीस (२०) चपाती आणि जिरा राईस फक्त २५००/- रुपये
*🐓सयाजी स्पेशल चिकन-*🐓 चिकन सुक्का तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १९००/- रुपये
*🐣सयाजी स्पेशल अंडा-* 🐣अंडा मसाला, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा २० चपाती आणि जीरा राईस फक्त १४००/- रुपये
*🔸सयाजी बिर्याणी हाऊस*🔸🍲कमीत कमी सात लोकांसाठी
*🍲१ kg मटन दम बिर्याणी -१५००*
*🍛१ kg चिकन दम बिर्याणी- १२००*
चला तर मग भेट द्या हॉटेल 🍽️ *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट 🍽️ आणि आस्वाद घ्या कोल्हापुरी जेवणाचा..
*🟣आमचा पत्ता -*🖊️ सावंतवाडी गांधी चौक येथे दत्तात्रय निवास हॉटेल *सयाजी रेस्ट्रो* फॅमिली रेस्टॉरंट👨👩👦👦🍲
*🟣संपर्क-*
*_📱७५५९३९४१९९_*
*_📱९७०२४०९०४७_*
*🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻*
https://chat.whatsapp.com/FV623wefvSF6vDqUQp8G22
*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

