कोकणमहाराष्ट्रराजकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ श्रीधर अपार्टमेंट मध्ये माजी नगराध्यक्ष सौ.पल्लवी केसरकर यांचा ६० वा.वाढदिवस आज साजरा

 

◾आमच्या कुटुंबाचा समाजसेवा हा पिंड,राजकारण किंवा समाजकारण असो, कुटुबांचा मोठा लोकसंग्रह, त्यांच्या आशीर्वादाने सुखद वाटचाल ; माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि-२२ :- जीवन प्रवासात सर्वांच्या आशीर्वादाने सुखद वाटचाल करता आली हाच मोठा आजच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आनंदी क्षण आपण मानते असे माजी नगराध्यक्ष सौ पल्लवी दिपक केसरकर यांनी म्हटले आहे.

श्रीधर अपार्टमेंट मध्ये माजी नगराध्यक्ष सौ पल्लवी केसरकर यांचा ६० वा.वाढदिवस आज साजरा करण्यात आला. यावेळी माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर, सौ शितल केसरकर, कन्या सौ सोनल वगळ केसरकर ,नातू अर्जून वगळ, अर्बन बँकेचे अध्यक्ष अँड सुभाष पणदूरकर, अशोक दळवी, गणेशप्रसाद गवस, गजानन नाटेकर,राजू तावडे, सुरेश सावंत, महादेव राऊळ,नंदू गावडे, आणि कार्यालय कर्मचारी वृंद आदी मान्यवर उपस्थित होते

यावेळी सौ पल्लवी केसरकर म्हणाल्या, कोविड नियमावलीचे पालन करत आपण जीवन प्रवासातील वाढदिवसानिमित्त आनंदी क्षण साजरा करत आहे. राजकारण किंवा समाजकारण असो, आमच्या कुटुंबाचा मोठा लोकसंग्रह आहे. सर्वांच्या आशीर्वादाने सुखद वाटचाल करता आली. मी राजकारणात नगराध्यक्ष म्हणून प्रवेश केला, पण मला फारसे प्रभावी काम करता आले नाही. माझ्यापेक्षा इतरांना काम करण्याची संधी दिली.

सौ. पल्लवी केसरकर म्हणाल्या,आमदार दीपक केसरकर आमदार म्हणून चांगले काम करू शकले ते विकास निधी चांगल्या प्रकारे आणू शकले पुढील काळातही ते समाजसेवा करतच राहतील. आमच्या कुटुंबाचा समाजसेवा हा पिंड आहे तो सुरू राहील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!