◾बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांचा आज सशर्त जामीन मंजूर..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी, दि-२२-: बेकायदेशीरपणे गुटखा वाहतूक प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या दोघांचा आज जिल्हा न्यायलयाने सशर्त जामीन मंजूर केला आहे. प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या जामिनावर त्यांची मुक्तता करण्यात आली आहे. याकामी आरोपी तर्फे अँड. सुहेब डिंगणकर, अँड. सागर ठाकूर, अँड. गौरव केसरकर यांनी काम पाहिले आहे.

