कोकणमहाराष्ट्रशैक्षणिकसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

🛑 रेनबो शिशुविहारच्या चिमुकल्या वारकऱ्यांची दिंडी ठरली लक्षवेधी

🛑 विठ्ठल-रुक्मिणी, संतांच्या वेशभूषेत आषाढी एकादशीचा उत्साह

🎥 KOKAN LIVE BREAKING ||NEWS CHANNEL

✍ प्रतिनिधी : सहदेव राऊळ

🎴सावंतवाडी, दि-२६:- मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित रेनबो शिशुविहार प्रशालेत आषाढी एकादशीनिमित्त चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढलेली पारंपरिक वारकरी दिंडी लक्षवेढी ठरली. दिंडीतील विठ्ठल-रुक्मिणी व संतांच्या वेशभूषेत सजलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसाने भारावून उपस्थितांना भक्तीमय वातावरणाची अनुभूती झाली.
मळगाव ऐक्यवर्धक संघ, मुंबई संचलित रेनबो शिशुविहार प्रशालेत आषाढी एकादशीचे औचित्य साधून पारंपरिक वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकरी संस्कृतीचा आनंद लुटला.
या दिंडीत विद्यार्थ्यांनी भगवान विठ्ठल, माता रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर तसेच इतर वारकरी संतांच्या आकर्षक वेशभूषा साकारल्या. टाळ, मृदंग, भगवे पताके, तुळस आणि “ज्ञानोबा-तुकाराम”, “पांडुरंग हरी” या जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला. चिमुकल्यांच्या निरागस भक्तिभावाने उपस्थित पालक व नागरिकांचे लक्ष वेधून घेतले. कार्यक्रमाला स्कूल कमिटीचे चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक मारुती फाले, माजी मुख्याध्यापक तथा शिक्षण सल्लागार वैजनाथ देवण, पर्यवेक्षक विठ्ठल सावंत, सहाय्यक शिक्षिका आनंदी मौर्ये, श्रुती लातये, सुखदा राऊळ, रविना राणे, सुनंदा कुंभार, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक मारुती फाले, सहाय्यक शिक्षिका आनंदी मौर्ये, श्रुती लातये, सुखदा राऊळ, रविना राणे, सुनंदा कुंभार, शाळेचे माजी मुख्याध्यापक वैजनाथ देवण यांनी विशेष परिश्रम घेतले. पालकांनीही विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागाचे कौतुक करत अशा संस्कारक्षम उपक्रमांचे स्वागत केले.
भारतीय संतपरंपरा, वारकरी संस्कृती आणि आध्यात्मिक मूल्यांची ओळख लहान वयातच विद्यार्थ्यांना व्हावी, तसेच भक्ती, संस्कार, एकात्मता आणि सांस्कृतिक जाणीव रुजावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम सर्वांच्या स्मरणात राहिला. रेनबो शिशुविहारच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

*………….सविस्तर बातमीसाठी खालील लिंक वर क्लिक करा…….👇👇👇👇*

_________________________
*❇️कोकण लाईव्ह ब्रेकिंग न्यूज चॅनेल च्या व्हाट्सअँप ग्रुप मध्ये सामील होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा*

https://chat.whatsapp.com/GX6edZZhJPuIF8DertMr8J
——————————–

💡💡 *लाईट बिल जास्त येते ?* 💡💡
🌠🌠 *सौर उर्जेची वीज निर्मिती कमी झाली?* 🌠🌠
🥰 *काळजी करु नका, आम्ही तुमचं वीज बील भरू !* 😊

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️ *महाराष्ट्रात प्रथमच* 🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️

🌞🌞 *पीएम सुर्यघर मोफत वीज योजना* 🌞🌞

श्रीराम बोअरवेल प्रस्तुत,
☀️☀️ *श्रीराम सोलर, सावंतवाडी* ☀️☀️

🛣️नवीन शिरोडा नाका, माजगाव रोड, सावंतवाडी. पिन – ४१६ ५१०

👉👉आमची हमी 🤷🏻‍♀️

जर सोलरने कमी युनिट मिळाली, तर उरलेली प्रती युनिट रक्कम थेट MSEB खात्यात जमा करू !

🎪☀️ *आमचे लक्ष “घरोघरी मोफत बिजली !”* 🌞🎪

☀️💫 *घरगुती सबसिडी ON-GRID* 🌞💫

🌞१ किलोवॅट ३०,०००/-

🌞२ किलोवॅट ६०,०००/-

🌞३ किलोवॅट पासून पुढे ७८,०००/-

🎪☀️ *अपार्टमेंट / सोसायटी सबसिडी* 🎪☀️

💫₹18,000/- प्रती किलोवॅट

💫कमास ५०० ₹90,00,000

☀️🌞 *आपण सोलर कुठे बसवू शकता?* ☀️🌞

🏘️ घर / अपार्टमेंट
🏬 शाळा / कॉलेज
🏢 हॉटेल
🏭 कंपनी / ऑफीस
🏥 हॉस्पीटल
⛺ नर्सरी
सर्व ठिकाणी सोलर बसवू शकता !

🤷🏻‍♀️🤷🏻‍♀️तर आजच अधिक माहितीसाठी आवश्य संपर्क साधा

📱0888 999 8824
📱0777 592 1004

☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️🌞☀️
________________________________
*🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻*
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल 👇🏻*
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

*🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻*

Home

*🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻*
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

*🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻*
https://t.me/kokanlive

*🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻*

*🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग*
_अचूक बातमी थेट हल्ला_

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!