◾ सावंतवाडीकरांनी अनुभवला ” एमटीबी ” सायकलिंगचा थरार..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे
🎴सावंतवाडी दि.२१:- सावंतवाडी, मळगाव येथे सायकल चालविणाऱ्यासाठी साहसी स्पर्धा घेण्यात आली. एमटीबी सायकलिंग थरार सिंधुदुर्गात प्रथमच आयोजित करण्यात आला होता.
सिंधुदूर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, मळगाव येथे सायकल चालविणाऱ्यासाठी एमटीबी साहसी प्रकार घेण्यात आला. यात जिल्ह्याभरातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यात लहान, मोठ्यांनी सहभाग दर्शविला सिंधुदूर्ग जिल्ह्यात सायकलिंगची परंपरा पुन्हा सुरू होत आहे. रस्त्यावर बरेच जण सायकल चालवितात. परंतु एमटीबी सायकलिंग किंवा ज्याला ट्रेल सायकलिंग आपण फक्त मल्टी मीडियावर पहात आलो आपल्या जिल्ह्यात एमटीबी सायकलिंगची आवड असलेले बरेच युवक, लहान मूल आहेत. परुंतु ट्रेल सायकलिंग कोठे, कसे करायचे ? चालवताना कसब, सराव या पासून अनभिज्ञ आहेत असे हरीश नार्वेकर यांनी सांगितले.
आठ किलो मीटरचा हा सायकलिंगचा ट्रेलर मळगावच्या डोंगरातील खडबडीत पायवाटा, छोट्या पायऱ्या, शेतीचे बांध यावरून वाट काढत सुरू झाला. मळगाव येथीलच कपिल मळगावकर, श्रीश नार्वेकर, पुष्कर काशाळीकर यांच्या संकल्पनेतून ट्रेल सायकलिंग आयोजित करण्यात आली

