कोकणमहाराष्ट्रशासकीयसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ कलंबीस्त वाचनालय आणि दुग्ध संस्थेच्या वतीने व खासदार विनायक राऊत यांच्या हस्ते कोविड योध्दांचा करण्यात आला सन्मान..

 

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : प्रथमेश गावडे

🎴सावंतवाडी, दि.२१ :- चांदा ते बांदा योजनेच्या ऐवजी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यासाठी महाविकासआघाडी ने सुरु केलेल्या सिंधुरत्न योजनेतून दुग्ध उत्पादनासाठी प्रत्येक गावात एक दुग्ध संचय चिलिंग प्लांट उभा करण्यात येणार आहे. सिंधूरत्न योजनेकरिता राज्याच्या अर्थसंकल्पात शंभर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी कलंबिस्त येथे बोलताना दिली.

तसेच लवकरच दोडामार्ग तालुक्यातील आडाळी येथील एमआयडीसीत गोव्यातील चार उद्योग प्रकल्प सुरू करण्यावर भर दिला जात आहे.या उद्योजकांशी सकारात्मक चर्चा झाल्याचेही खासदार राऊत यांनी सांगितले

कलंबिस्त गावातील रबर प्लांटेशन च्या जागी प्रदूषण मुक्त प्रकल्प आणण्यासाठीही विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.

खासदार विनायक राऊत कलंबिस्त येथील श्री देव लिंगेश्वर मंदिरात बोलत होते. त्यांच्या हस्ते सैनिकी गाव असलेल्या कलंबिस्त मधील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला कलंबिस्त ज्ञानमंदिर वाचनालय व कलंबिस्त पंचक्रोशी दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्थेच्या वतीने झालेल्या या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते

यावेळी शिवसेना सावंतवाडी मतदार संघ प्रमुख विक्रांत सावंत, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, दुग्ध संस्था अध्यक्ष अँड संतोष सावंत, सेक्रेटरी रूपा सावंत, खासदार कन्या रूची राऊत, खासदार सुपुत्र गीतेश राऊत, मंदिर मानकरी श्री. देवकर,रामा म्हाडगुत, शिवसेना तालुका महिला संघटक अपर्णा कोठावळे, अमित वेंगुर्लेकर, उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोठावळे, उपतालुकापमुख संदीप माळकर, हरिश्चंद्र पवार, ओवळीचे उपसरपंच विनायक सावंत, दुग्ध संस्था रमेश सावंत, सरपंच शरद नाईक आदी उपस्थित होते.

यावेळी कोविड काळात कोविड योध्दा म्हणून काम केलेल्या जिल्हा रुग्णालयातील उषा यशवंत गावडे, आरोग्य सेविका मानसी गोपाळ गावडे, स्टाफ नर्स सुप्रिया कृष्णा पास्ते, अश्विनी अर्जुन सुकी, श्रद्धा संदीप सावंत, कोविड सेंटर राधिका कृष्णकांत सावंत, वृंदा रमाकांत सावंत, दीप्ती दशरथ पास्ते आशा सेविका, सरपंच शरद नाईक, सांगेली सरपंच डॉ मनस्वी राऊळ, धोंडी पास्ते, तलाठी सयाजी पवार, तलाठी कर्नल अरुण सावंत, रेशन दुकानदार महेश पास्ते, पोलीस हवालदार श्री आरोसकर, वायरमन विष्णू पास्ते, वायरमन हनुमंत पास्ते, वायरमन लक्ष्मण राऊळ, साधना सावंत, पुंडलीक राणे, शंकर सावंत, महादेव कलमिस्तकर, मयुरी कलमिसकर, डॉ अर्जुन म्‍हाडगुत, रमाकांत राऊळ, पत्रकार अभिमन्यू लोंढे, पत्रकार हरिश्चंद्र पवार, अपर्णा कोठावळे, तलाठी घाडीगावकर, ग्रामसेवक फुंदे आदींचा सन्मान करण्यात आला

खासदार राऊत पुढे म्हणाले,रक्ताची नाती विसरायला लावणाऱ्या कोरोना काळात माणुसकी जिवंत राहिली या अनेकांनी अन्नदाता बनून आपली माणुसकी दाखवली तर कलंबिस्त येथील वाचनालय आणि दुग्ध सहकारी संस्थेने आरोग्य, महसुल, शेक्षणिक, सैन्यदल योद्ध्यांचा सन्मान करून दातृत्व दाखवून दिले. राज्यातील पहिल्या तीन जिल्ह्यांमध्ये उत्कृष्ट काम सिंधुदुर्ग जिल्ह्याचे कोरोना काळात झाले आहे.

खासदार राऊत म्हणाले, तालुक्यातील शिरशिंगे येथील खचलेल्या डोंगर संरक्षक भिंत उभारण्यासाठी ७२ कोटी मंजूर केले आहेत.

सिंधूरत्न योजनेतून दुग्ध प्रकल्पासाठी चांदा ते बांदा मधुन मंजूर झालेल्या प्रस्तावना प्राधान्य दिले जाईल.गोव्यातील उद्योजक कंपन्यांशी बोलणी सुरु आहे दोडामार्ग आडाळी एमआयडीसीमध्ये प्रकल्प उभारण्याचा संकल्प आहे. आमदार दीपक केसरकर यांच्या माध्यमातून या भागाचा विकास करण्यासाठी शिवसेना कटिबद्धध आहे.

यावेळी बोलताना युवा नेते विक्रांत सावंत म्हणाले, खासदार राऊत हे दुर्गम भागात गावांगावांत पोहचले असून पायाला भिंगरी बांधुन ते ४०० कि.मी पर्यत फिरतात. खासदार राऊत दुर्गम भागात जाऊन लोकांना धीर दिला आहे.कलंबिस्त सारख्या गावातील ग्रामस्थांचा आवाज नेत्यापर्यंत मंत्रा पर्यंत पोहोचवून विकास कामांच्या पाठीशी शिवसेना २४ तास १२ महिने तत्पर राहील असे आश्वासन यावेळी बोलताना दिले.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात प्रास्ताविकात बोलताना अँड. संतोष सावंत म्हणाले, कलंबिस्त गावात रबर प्रकल्प २६५ हेक्टर क्षेत्रावर होता,ती जागा पडून आहे या ठिकाणी प्रदूषण मुक्त प्रकल्प व्हावा तर या भागात मोबाईल रेंज नसल्याने सैनिक परंपरा लाभलेल्या गावात मोबाईल टाँवर व्हायला पाहिजे. राज्यातील वाचनालयाना उर्जितावस्था यावी यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!