कोकणमहाराष्ट्रसामाजिकसावंतवाडीसिंधुदुर्ग

◾ साईंच्या पालखीचे बांदा शहरात भक्तीमय वातावरणात स्वागत..

  🖥 Kokan Live Braking News

✍️प्रतिनिधी : शैलेश गवस

🎴बांदा दि.२१ :-  बांदा शहरात साळगाव गाेवा ते कुडाळ तालुव्यातील कवीलकाटे गाव येथील साईमंदीरात पदयाञेने जाणा-य़ा साईच्या पालखीचे श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या वतीने भक्तीपुर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले.

या पदयाञेत गाेवा राज्यातील सुमारे ८० साईभक्त सहभागी झाले हाेते. टाळ म्रुंदुगांच्या गजरात ,साईनामाच्या जयघाेषाने बांद्यातील साईमंदीराचा परीसर भक्तीमय झाला हाेता. श्री साईबाबा भक्त सेवा मंडळाच्या महीला सदस्या साै दर्शना राकेश केसरकर, साै राजश्री गुरुनाथ तेंडले दिप ओवाळुन पालखीचे स्वागत केले. यावेळी मंडळाचे उपाध्यष रविंद्र मालवणकर व मंडळाचे सल्लागार सतिश येडवे यानी पदयाञेत सहभागी झालेल्या प्रतीनीधींचा मंडळाच्या वतीने शाल व श्रीफऴ देऊन सन्मान केला.

या कार्यक्रमास श्री साईबाबा भक्त सेवामंडळाचे अध्यष राकेश केसरकर, विश्वस्त राजेश कारेकर, साईराज सांळगावकर, प्रितम हरमलकर, शैलेश केसरकर, मंगलदास साऴगावकर, प्रितेश केसरकर, दत्तप्रसाद केसरकर, संकल्प केसरकर, ज्ञानेश्वर केसरकर, साै प्रिया केसरकर नवनिर्वाचीत पंचायत समिती प्रभारी सभापती वसंत उर्फ शितल राऊऴ उपस्थित हाेते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!