◾ मनसेच्या ओरोस येथील सदस्य नोंदणी अभियानाला जनतेचा उत्फुर्त प्रतिसाद..
◾ केंद्र व राज्यातील अन्य पक्षांचा आजपर्यंतचा अनुभव पाहता फक्त राज ठाकरेचं महाराष्ट्राचं उज्वल भविष्य…सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया
◾ पद,पैसा आणि सत्तेच्या आहारी न जाता जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून पक्षाची ध्येय धोरणे निष्ठापूर्वक राबावणाऱ्या कुडाळ मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे जेष्ठांकडून कौतुक..
🖥️ Kokan Live Braking News
✍️ प्रतिनिधी : गणेश तोडकर
🎴कुडाळ,दि-२१:- आज दि. २१ मार्च २०२१ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कुडाळ तालुक्यातीच्या पदाधिकाऱ्यांनी ओरोस येथे राबविलेल्या सदस्य नोंदणी अभियानाला जनतेचा उत्फुर्त प्रतिसाद मिळाला.मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उर्फ जीजी उपरकर यांच्या मार्गदर्शनानुसार मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे,सचिव राजेश टंगसाळी,अणावं सरपंच आपा मांजरेकर,उपतालुकाध्यक्ष अविनाश अणावकर,सचिन मयेकर आदी पदाधिकऱ्यांनी ओरोस फाटा येथे सदस्य नोंदणी अभियान राबवत “नोंदणी अभियान सप्ताहाचा” शुभारंभ केला.ओरोस आठवडा बाजाराला आलेल्या ग्रामस्थांनी उत्फुर्तपणे ऑनलाइन प्रक्रियेद्वारे पक्षाचे सदस्यत्व स्वीकारून भरभरून प्रतिसाद दिला.
सद्यस्थितीत केंद्र व राज्यातील सत्ताधारी पक्षांची धोरणे व कारभार पाहता राज ठाकरेंच आगामी काळात महाराष्ट्राला नवी दिशा देतील अशा भावना नोंदणीसाठी आलेल्या ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

