आणखीकोकणरत्नागिरीसामाजिक

आयुर्वेदतज्ज्ञ अनुपमा कदम यांच्या औषधांनी अनेक रुग्णांवर यशस्वी उपचार

◼️ महाराष्ट्र प्रमाणेच अनेक राज्यात औषधाचा प्रसार…

🖥️Kokan Live Breaking News

 ✍️प्रतिनीधी : संतोष पिलके

🎴चिपळूण : दि. २१ शहरातील आयुर्वेदतज्ज्ञ अनुपमा कदम यांच्या औषधांनी अनेक रुग्णांचे समाधान झाले असून त्यांनी कोरोना कालावधीत तर तब्बल चार हजारहून अधिक रुग्णांवर आयुर्वेदिक औषध देऊन यशस्वी उपचार केल्याचा दावा अनुपमा कदम करत आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून त्या आयुर्वेद शास्त्रांमध्ये अभ्यास आणि संशोधन करत आहेत.

आत्तापर्यंत न्यूमोनिया, किडनी स्टोन, उच्च रक्तदाब, मधुमेह, सांधेदुखी, ब्लॉकेजेस,कोलेस्ट्रॉल अशाप्रकारे अनेक आजारांवर यशस्वी उपचार केले आहेत . कोरोनाचा संसर्ग सर्वत्र सुरू झाल्यानंतर त्यांनी या आजारावरील औषधाचे संशोधन केले आणि कोरोनाची लक्षण असणारे रुग्णांवर औषध देऊन प्रयोग केला असता त्यामध्ये कोरोनाबाधितांना चांगला गुण आला असल्याचे त्या सांगतात.नुकतीच त्यांच्या संस्थेला नोंदणीपत्र मिळाले असून या संस्थेच्या माध्यमातून औषध निर्माण आणि संशोधन केंद्र तसेच अनेक नैसर्गिक पदार्थांच्या वापराबाबत मार्गदर्शन,योग उपचार आदी विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या डि फार्मा प्रयोगशाळेची मान्यता त्यांना मिळालेली आहे.अतिशय माफक दरात उपचार करण्यात आलेल्या त्यांच्या औषधांचा उपयोग महाराष्ट्र प्रमाणेच अनेक राज्यात सध्यस्थीतीत सुरू आहे.त्याचप्रमाणे वजन संतुलन साठी देत असलेला त्यांचा डाएट प्लॅन अनेकांना उपयुक्त ठरत आहे.यासाठी अनेक ठिकाणाहून त्यांना विचारणा होत असते.एखादया रुग्णाची परिस्थिती नसेल तर त्या मोफत उपचार देखील देत असतात.त्यांच्या औषधांनी फरक पडलेल्या बाहेर गावच्या अनेक रुग्णांनी त्यांना भेटण्याचा आग्रह धरला असल्याचे समजते.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!