कोकणमहाराष्ट्रमुंबईराजकीयशासकीयसामाजिक

◾ शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी घेतली पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची भेट..

 

◾ मात्र या भेटी नंतर सिलीकाॅन व्यावसायिकांचे धाबे दणाणले..

🖥️ Kokan Live Braking News

✍️ प्रतिनिधी : किशोर धुरे

🎴मुंबई, दि-२१:-  शिवसेना नेते अतुल रावराणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेतली. अतुल रावराणे आणि आदित्य ठाकरे यांच्यातील चर्चचा तपशील मात्र गुलदस्त्यात राहिला आहे,अतुल रावराणे यांनी जिल्ह्यातील सिलिका मायनिंगचा विषय लाऊन धरला होता व त्या संदर्भात भेट असल्याचे बोलले जाते ,त्यामुळे या भेटीला आहे विशेष महत्व प्राप्त झाले आहे व सिलीकाॅन व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

मंत्री आदित्य ठाकरेही पर्यावरण प्रेमी असल्याने पर्यावरणला हानी पोहचवणाऱ्या अनेक मोठ्या प्रकल्पांना आदित्य ठाकरेंनी विरोध दर्शवला होता आरेतील मेट्रो कारशेडला जाहीर विरोध करत सत्तेचीसुद्धा पर्वा केली नव्हती सत्तेत आल्यानंतर आरेतील मेट्रो कारशेड अन्यत्र हलवली होती.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरेतील ६०० एकर जमीन जंगल म्हणून घोषित केले या निर्णयात आदित्य ठाकरे यांचा मोठा पाठपुरावा होता यावरून आदित्य ठाकरे यांची पर्यावरणाबाबतची तळमळ दिसून येते ,सिंधुदुर्गमधील पर्यवरणाच्या मुद्द्यावर आदित्य ठाकरे सेन्सेटिव्हआहेत जिल्ह्यातील सिलिका मायनिंगचा विषय सध्या गाजतोय याकडे अतुल रावराणे यांनी मुख्यमंत्र्यांचं लक्ष वेधलं होत

त्यामुळे रावराणे – ठाकरे भेटीला विशेष महत्व प्राप्त झाले आहे,आदित्य ठाकरेंनी रावराणे यांना कोणत आश्वासन दिलं, नक्की काय झाली चर्चा हे अतुल रावराणे आल्यानंतरचं होईल स्पष्टहोणार आहे मात्र, या भेटीनंतर वाळू माफियांचे धाबे दणाणलेले दिसून येत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!