चिपळूण लोटे औदयोगिक वसाहती मधील घरडा केमिकल्स मधील दुर्घटना ग्रस्त स्थळाची उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या कडून पाहणी
🖥️Kokan Live Breaking News
✍️प्रतिनिधी : ओंकार रेळेकर
🎴 चिपळूण : दि. २० लोटे, चिपळूण येथील घरडा केमिकल्स कंपनीमध्ये स्फोट होऊन दुर्घटना झाल्याचे वृत्त समजताच मंत्री महोदय उदय सामंत यांनी आपला दिवसभराचा नियोजित कार्यक्रम रद्द करून दुर्घटना स्थळाला तातडीने भेट देऊन पहाणी केली.
कंपनीच्या केमिकल उत्पादन करणाऱ्या प्लांटच्या सातव्या युनिट मध्ये हि दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेत चार कामगार मृत्यू पावले असून एक कामगार गंभीरपणे जखमी झाला आहे.या कामगाराला पुढील उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. या दुर्घटेमुळे मृत पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबियांना तसेच जखमींना तातडीने मदत देण्यात यावी असे निर्देश मंत्री महोदयांनी कंपनीला दिले.जखमी अवस्थेत असलेल्या कामगारांना तात्काळ उपचार मिळण्यासाठी आवश्यक त्या सूचना आरोग्य विभागाला दिल्या.
मंत्री महोदयांनी दिलेल्या सूचनेनुसार कंपनीने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना पंचावन्न लाख रुपये तर जखमी अवस्थेत असलेल्या कामगारांना उपचार खर्च व वीस लाख रुपये देण्याचे जाहीर केले.
पाहणी केल्या नंतर झालेल्या बैठकीत कंपनीचे मान्यताप्राप्त युनिट कडून स्ट्रक्चरल ऑडिट, तसेच केमिकल ऑडिट करून घेण्याच्या सूचना मंत्री महोदयांनी दिल्या.जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबांनी कंपनीचा सर्व परिसर सी.सी.टीव्ही.कक्षेच्या खाली आणावा अशा सूचना दिल्या.
या पहाणी आणि आढावा बैठकीत पोलीस अधीक्षक साहेब, कंपनीचे संबंधित अधिकारी, बाबूशेठ म्हाप, अण्णा कदम, स्थानिक पत्रकार, इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रतिनिधी इत्यादींचा सहभाग होता.
💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥
💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥
🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥
🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712
🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5
🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

