आणखीकुडाळकोकणराजकीयसिंधुदुर्ग

कुडाळ नगरपंचायत बांधकाम प्रशासन व विकासक यांच्या संगनमताने महालक्ष्मी अपार्टमेंटच्या मूळ ढाच्यात बदल झाल्याचा आरोप

◼️सदनिकाधारक उमेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली सखोल चौकशीची मागणी

◼️महालक्ष्मी गृहनिर्माण संस्थेनेही नगरपंचायत प्रशासनाकडे केली विकासका विरुद्ध तक्रार

🖥️Kokan Live Breaking News

✍️ब्युरो न्युज : कोकण लाईव्ह ब्रेकिंग

🎴कुडाळ : दि. २० नगरपंचायत हद्दीत लक्ष्मी वाडी येथे विठ्ठल बापू तेली या विकासकाने इमारत बांधली होती रहिवासी इमारतीत राहायला गेल्यानंतर सदर विकासकाने मंजूर आराखड्यात बदल करून इमारतीच्या भागात बदल केला ,याबाबतची कोणतीही कल्पना ईमारतीत राहणा-या सदनिका धारकांना दिली नाही ,याबाबत उमेश राणे या सदनिका धारकाने नगरपंचायत कडे तक्रार केल्यावर सदर विकासकाला दोन वेळा नोटीस पाठविण्यात आल्या तर मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी तक्रारदार यांच्या अर्जावरून बांधकाम विभागाला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

तत्कालीन बांधकाम विभाग प्रमुख निलेश महाडेश्वर यांना आदेश दिले होते मात्र त्यांनी याबाबतचा अहवाल सादर केलाच नाही व त्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या,या गोष्टीला अडीच वर्षाचा काळ लोटला तो पर्यंत गृहनिर्माण संस्था स्थापन करण्यात आली, विकासकाने गृहनिर्माण संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र न घेता बदल केलेल्या इमारतीच्या आराखड्याला परत परवानगी मिळावी यासाठी कुडाळ नगल पंचायत प्रशासनाकडे अर्ज दाखल केल व कागदपत्रांची शहानिशा न करता नगर अभियंता बांधकाम विभाग यांनी ही परवानगी सात दिवसात त्यांना दिली यावरून आर्थिक गौडबंगाल दिसून येते असा आरोप करण्यात आला आहे.

मंजूर आराखड्यात बदल करणे हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे, तसा बदल केला तर इमारतीची परवानगी रद्द होऊ शकते, व इमारतीच्या ढाच्या मध्ये काही बदल करायचा असला तर त्याची रीतसर परवानगी नगरपंचायत प्रशासना कडून घेणे बंधनकारक असताना विकासकाने तशी कोणतीही कार्यवाही न करता परस्पर बिल्डिंगच्या ढाच्या मध्ये बदल करू परवानगी मिळवली आहे. याबाबत कागदपत्रांमध्ये खाडाखोड ही झाली आहे व हा सर्व खटाटोप तळमजल्यावरील सदनिकेचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला होता त्यामुळे ती सदनिका विकली जात नव्हती म्हणून मुख्य भिंत फोडून दरवाजा बदलण्यात आला व तो दरवाजा केल्यामुळे बी व सी विंग मधील सदनिका धारकांना जाण्या येण्याचा त्रास होऊ लागला.व विकासका विरुद्ध तक्रारी सुरू झाल्यात मात्र विकासकाने आपले वजन वापरुन अखेर परवानगी मिळवली असा गृहनिर्माण संस्थेचा आरोप आहे.

या प्रकाराची निपक्षपातीपणे चौकशी करावी अशी मागणी सदनिकाधारक उमेश राणे यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.

💥कोकणवासीयांच्या ज्वलंत प्रश्नांवर प्रकाशझोत टाकणारे डॅशिंग न्यूज चॅनल..🔥

💥गोरगरिबांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारे दिलासादायक व्यासपीठ..🔥

🔥💥 कोकण लाईव्ह ब्रेकिंग 💥🔥

🌐 जाहिराती व बातम्यांसाठी आजच भेट द्या….⬇️
♦संपादक : सीताराम गावडे
📱संपर्क : +919423304856
♦कार्यकारी संपादक : आनंद धोंड
📱संपर्क : +919423958828
♦ब्युरो चीफ : विशाल पित्रे
📱संपर्क : +919405475712

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!