आणखीआपत्कालीनकणकवलीकोकणसिंधुदुर्ग

फोंडा येथील घटना, पोटाला गंभीर दुखापत, चालकाने केले रुग्णालयात दाखल…

🖥️Kokan Live Breaking News

✍️ प्रतिनिधी : रविकांत जाधव

🎴कणकवली : दि. २० वस्तीला असलेल्या एस.टी. बसमधील वाहकाने तिकीट मशीन खुंटीला टांगून ठेवली होती. त्या मशीनचा अचानक स्फोट झाल्याने वाहक गंभीर जखमी झाला. त्याला अधिक उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आर. डी. मणचेकर असे त्या वाहकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी रात्री साडेबारा वाजण्याच्या सुमारास फोंडा विश्रामगृहात घडली.

दरम्यान संबंधित एस.टी.च्या चालकाने उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल केले. याबाबत अधिक माहिती अशी की, विजयदुर्ग आगाराची एस.टी. बस फोंडा येथे वस्तीसाठी थांबली होती. दरम्यान एस.टी.चे चालक व वाहक येथील विश्रामगृहावर थांबले होते. दरम्यान बाजूला असलेल्या तिकीट मशीनचा अचानक स्फोट झाला. या स्फोटात ती मशीन उडून वाहकाच्या पोटावर पडली. यात त्यांना गंभीर दुखापत झाली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ सोबत असलेल्या वाहकाने ती मशीन बाजूला केली. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

🎴कोकण लाईव्ह फेसबुक पेज👇🏻
https://www.facebook.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह युटयूब चॅनल👇🏻
https://www.youtube.com/channel/UC4OBZsXZuVI8r7ezVUUeOJg

🎴कोकण लाईव्ह व्हॉट्सॲप ग्रुप👇🏻
https://chat.whatsapp.com/IUVtgTt877x127y3I8wRp5

🎴कोकण लाईव्ह वेबसाईट👇🏻
http://kokanlivebreaking.live

🎴कोकण लाईव्ह इंस्टाग्राम👇🏻
https://www.instagram.com/kokanlivebreaking/

🎴कोकण लाईव्ह टेलिग्राम👇🏻
https://t.me/kokanlive

🎴कोकण लाईव्ह ट्विटर👇🏻
https://twitter.com/livekokan

🖥️ कोकण लाईव्ह ब्रेकिंग
अचूक बातमी थेट हल्ला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!